एम.एच.४६, बीएम ३१३५ आणि एम.एच.१२ के.वाय.१२०७ या क्रमांकाच्या इर्टीका कंपनीच्या कार आहेत. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या कारची समोरासमोर धडक झाली. तामसा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जगडे, अडसुळे, कोळशीकर यांच्यासह समोरच्या कारमधील चार ते पाच जण जखमी झाले आहेत.जखमींवर बारड येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नांदेडातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना महामार्गचे पोनि. अरुण केंद्रे, बारडचे प्रभारी अधिकारी विठ्ठल दूरपडे, भागवत आयनेले, अफसर पठाण, देवानंद थाडके, बालाजी ठाकूर यांनी तातडीने रुग्णालयात हलविले. या अपघातामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. एका वाहनाचा चालक गाडीतच अडकून पडला होता. गॅस कटरच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.
पोलिसांच्या वाहनाला अपघात, आठ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:45 AM