शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

नांदेड जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ३३८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 7:50 PM

सध्या जिल्ह्यात ३ हजार ८१८ जणांवर उपचार सुरू

ठळक मुद्देगुरुवारी २६४ बाधित रुग्णांची भर ४२ बाधितांची प्रकृती गंभीर

नांदेड : मागील २४ तासात आणखी आठ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३३८ एवढी झाली आहे. तर गुरुवारी आणखी २६४ बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १२ हजार ७०१ एवढी झाली असून यातील ३ हजार ८१८ जणांवर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा कमी होत नसल्याचे गुरुवारी पुन्हा पुढे आले. मागील २४ तासात ४ पुरुष आणि ४ महिलांचा उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला. यातील पाच जणांचे मृत्यू खाजगी रुग्णालयात झाले आहेत. माहूर तालुक्यातील कारंजी येथील ६२ वर्षीय महिला नांदेड शहरातील, दत्तनगर येथील ६५ वर्षीय महिला, नांदेडमधीलच बालाजीनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, विशालनगरमधील ६५ वर्षीय पुरुष आणि चौफाळा येथील ५५ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला तर धर्माबाद तालुक्यातील येताळा येथील २० वर्षीय महिला आणि मुदखेड येथील ५५ वर्षीय महिलेचा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला असून अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील ५० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, गुरुवारी स्वॅब तपासणीद्वारे १३७ तर अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे १२७ असे एकूण २६४ जण बाधित आढळून आले. स्वॅब तपासणीद्वारे बाधित आढळलेल्यामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ९७, नांदेड ग्रामीणमधील ६, लोहा ४, हदगाव १, कंधार १, बिलोली १, हिंगोली २. लातूर २, बीड १. मुदखेड १. नायगाव ३, मुखेड ६, उमरी २, परभणी १ आणि यवतमाळ येथील एक जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे नांदेड मनपा क्षेत्रातील २४, नांदेड ग्रामीणमधील ५, हदगाव ५, अर्धापूर १८, किनवट १२, बिलोली १, मुखेड १८, हिमायतनगर १, धर्माबाद १०, उमरी २, मुदखेड ६, लोहा ४, कंधार ५, भोकर १, देगलूर १, नायगाव ५ आणि यवतमाळ येथील एकजण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

४२ बाधितांची प्रकृती गंभीरजिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ३ हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ३०८, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशन असे १५९४, जिल्हा रुग्णालय ८०, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ४०, नायगाव १३३, बिलोली ८६, मुखेड १७९, देगलूर ७५, लोहा ११४, हदगाव ५९, भोकर ३६, कंधार ५३, बारड २०, आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड ५७, अर्धापूर ३९, मुदखेड ७३, माहूर ११, किनवट २१८, धर्माबाद ५८, उमरी ८५, हिमायतनगर १६, जिल्हा मध्यवर्ती कारागृह ८२, खाजगी रुग्णालय ३९९, आणि औरंगाबाद, निजामाबाद आणि हैदराबाद येथे संदर्भित केलल्या प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहे. यातील ४२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू