शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

निवडणूक आयोगाला मिळेना ओबीसींचा डाटा; निवडणूक प्रक्रियेत अडसर

By प्रसाद आर्वीकर | Published: August 24, 2022 3:38 PM

ओबीसींचा इम्पेरिकल डाटा एकत्रित करण्यासाठी राज्य शासनाने सर्मपित आयोगाची स्थापना केली आहे.

नांदेड : जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींतील ओबीसींचा डाटा राज्य निवडणूक आयोगाला अद्याप मिळाला नसल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत अडसर निर्माण झाला आाहे. समर्पित आयोगाकडून हा डाटा मिळाल्यानंतरच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

ओबीसींचा इम्पेरिकल डाटा एकत्रित करण्यासाठी राज्य शासनाने सर्मपित आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाने राज्यभरातून हा डाटा संकलित करुन ओबीसी आरक्षण जाहीर केले आहे. गावनिहाय डाटा संकलित करण्यात आला असून, ओबीसींच्या संख्येनुसार त्या- त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाची टक्केवारी समर्पित आयोगाकडून दिली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी ओबीसींचे आरक्षण जाहीर करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, आगामी काळात या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. या निवडणुकांसाठी लागणारा ओबीसींचा डाटा सर्मपित आयोगाकडून राज्य निवडणूक आयोगाला दिला जातो. त्यानुसार आरक्षण प्रक्रिया राबविली जाते.

समर्पित आयोगाने हा डाटा राज्य निवडणूक आयोगाला उपलब्ध करुन दिला आहे. मात्र काही ग्रामपंचायतीतील ओबीसी आरक्षणाचा डाटा निवडणूक आयोगाला अजूनही मिळाला नाही. जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींतील ओबीसींची संख्या आणि आरक्षणाची टक्केवारी अद्याप निवडणूक आयोगाला मिळाली नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका घेण्यासाठी अडसर निर्माण होत आहे.

तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या३० सप्टेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात नांदेड जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मात्र मुदत संपलेल्या या ९४ ग्रामपंचायतींपैकी नायगाव तालुक्यातील मरवाळी/कोपरा, देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव आणि कंधार तालुक्यातील घुबडवाडी या ३ ग्रामपंचायतींमधील ओबीसींची संख्या, आरक्षणाची टक्केवारी निवडणूक आयोगाला मिळाली नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही या गावांची निवडणूक पुढे ढकलावी लागली आहे. डाटा उपलब्ध झाल्यानंतर या तीन गावांसाठी स्वतंत्र निवडणूक घ्यावी लागणार आहे.

या ११ गावांचा मिळेना डाटासमर्पित आयोगाकडून राज्य निवडणूक आयोगाला जिल्ह्यातील ११ गावांचा ओबीसींचा डाटा उपलब्ध झाला नाही. त्यात दीपला नाईक तांडा, जरुर तांडा, मलकजाम तांडा, वाळकी बु. (ता.किनवट), गुंडळ, शेख फरीद वझरा (ता.माहूर), मरवाळी/कोपरा (ता.नायगाव), निपाणी सावरगाव (ता.देगलूर), घुबडवाडी, सोमठाणा (ता.कंधार) आणि मंगरूळ (ता.लोहा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकOBCअन्य मागासवर्गीय जातीNandedनांदेड