जिल्ह्यात देगलूर, कुंडलवाडी, बिलोली, हदगाव, कंधार, धर्माबाद, उमरी, मुदखेड, अर्धापूर, माहूर आणि मुखेड नगरपालिकांच्या निवडणुका आगामी काळात घेतल्या जाणार आहेत. तर लोहा
या निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर या निवडणुका वार्ड पद्धतीने घ्यायच्या की प्रभाग पद्धतीने याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही तयारी सुरू झाली नाही. प्रशासकीय पातळीवर आदेशाची वाट पाहिली जात आहे. तर एकूणच निवडणूक प्रक्रियेला होत असलेला विलंब पाहता राजकीय कार्यकर्ते मात्र विचलित झाले आहेत.
चौकट -
आगामी महापालिका निवडणुका या वाॅर्ड पद्धतीनेच घ्याव्यात, असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण त्याच वेळी नगरपालिकांबाबतचा निर्णय मात्र अद्यापही वेटिंगवरच आहे. स्थानिक पातळीवर लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकांना आगामी काळात मोठे राजकीय महत्त्व येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न स्थानिक पातळीवर कायम राहतो की निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या जातील यावर लक्ष केंद्रित झाले आहे. परंतु महापालिका निवडणुकीत वाॅर्डरचना घोषित झाल्याने इच्छुकांनी मात्र मी निवडणूक लढवणारच, अशी स्पष्ट भूमिका घेत तयारीही सुरू केली आहे.