शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस

By श्रीनिवास भोसले | Published: November 07, 2024 8:16 PM

प्रतापराव राष्ट्रवादीत गेल्याने आता शिवाजीनगरच सत्ताकेंद्र

- श्रीनिवास भोसलेनांदेड : आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामुळे नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु, आजघडीला अशोकराव भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील भाजप पहिल्यांदाच विधानसभेला सामोरी जात आहे. त्यात त्यांची कन्या श्रीजया यांची विधानसभेच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री करत आहे. त्यामुळे भोकरसह जिल्ह्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणणे अशोकरावांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.

दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून ते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात २०२४ पर्यंत नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची घोडदौड सुरू होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता काँग्रेसकडे कोणी नेतृत्व उरले नाही. त्यात भाजपमध्ये असलेले माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधले. परिणामी स्थानिक भाजपची पूर्ण कमांड अशोकराव चव्हाण यांच्या हाती आली आहे. त्यातून त्यांनी भाजपमध्ये आलेल्या आमदार जितेश अंतापूरकर यांना पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. भोकरसहदेगलूरची जागा त्यांच्या प्रतिष्ठेची असून उर्वरित भाजपच्या वाट्याला आलेल्या मुखेड, नायगावमध्ये देखील त्यांना लक्ष घालावे लागणार आहे. महायुतीचा धर्म पाळत सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अशोकरावांच्या नेतृत्वात नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाने तो आता भाजपचा झाल्याचे सिद्ध करण्याची ही वेळ आहे.

चार ठिकाणी भाजप विरूद्ध काँग्रेसनांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांपैकी भोकर, मुखेड, नायगाव, देगलूर या चार मतदारसंघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. तर किनवटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट विरूद्ध भाजप, नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये शिंदे सेना विरूद्ध काँग्रेस आणि लोहामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध उद्धवसेना असा सामना होत आहे.

मुख्यमंत्री असताना जिल्हा झाला होता काँग्रेसमयअशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ च्या निवडणुकीत नांदेड जिल्हा काँग्रेसमय झाला होता. त्यावेळी महायुतीचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. जिल्ह्यातील नऊपैकी भोकर, हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलूर, मुखेड या सहा ठिकाणी काँग्रेस, तर घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला किनवट आणि लोहा मतदारसंघात यश मिळाले होते. नायगावमध्ये वसंतराव चव्हाण यांनी अपक्ष बाजी मारली होती. तद्नंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. २०१४ मध्ये काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे चार, तर राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार होता. २०१९ मध्ये काँग्रेसच्या ताब्यात सर्वाधिक चार, भाजप तीन, शिवसेना एक आणि शेकापकडे एक विधानसभा मतदारसंघ होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokar-acभोकरdeglur-acदेगलूरkinwat-acकिनवटmukhed-acमुखेडnaigaon-acनायगाव