नांदेड : महावितरण कंपनीमध्ये प्रचलित शाखा कार्यालयाची वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या विचारात आहे़ याबाबत वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु करण्यात आल्या असून याविरोधात वीज कंपनीतील सहा संघटनांच्या कर्मचारी संपाचे हत्यार उपसले आहे़ सोमवारी सकाळी संपातील सहभागी कर्मचाऱ्यांनी वीज कार्यालयासमोर निदर्शने केली़शाखा कार्यालयातील बदलाच्या माध्यमातून वीज कर्मचाºयांच्या जागा आणखी कमी होणार असून ग्राहकांना वेळेत सेवा मिळणार नाही़ शाखा कार्यालये बंद करण्यात येणार असल्यामुळे अगोदरच अपुरी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आणखी कपात होणार आहे़ त्याचा ग्राहक सेवेवरही परिणाम होणार आहे़ संघटनेने या प्रस्तावावर काही सूचना दिल्या होत्या़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़या माध्यमातून खाजगी कंपनीला फायदा देण्याचा सरकारचा हेतू आहे़ एका बाजूला अतिउच्च दाब उपकेंद्राची वाढतीसंख्या, त्यांना जोडणाºया अतिउच्च दाब वाहिन्यांची वाढणारे जाळे सांभाळताना कर्मचारी व अभियंते मेटाकुटीला आलेले असताना आणखी कर्मचारी कमी करुन कर्मचारी आणि ग्राहकांना वेठीस धरणाचा हा प्रकार आहे़ त्यामुळे अभियंते आणि कर्मचाऱ्यांवर ग्राहकांचा रोष वाढणार आहे़ या विरोधात सोमवारपासून संप पुकारण्यात आला आहे़ संपात महाराष्ट्र स्टेट इले़ वर्कर्स फेडरेशन, महा़ वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, म़रा़वीज तांत्रिक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस या संघटनांचा सहभाग होता़
वीज कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:14 AM
महावितरण कंपनीमध्ये प्रचलित शाखा कार्यालयाची वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या विचारात आहे़ याबाबत वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु करण्यात आल्या असून याविरोधात वीज कंपनीतील सहा संघटनांच्या कर्मचारी संपाचे हत्यार उपसले आहे़
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा संप : सहा संघटनांचा संपात सहभाग