भारत दाढेल ।नांदेड : मराठवाड्यात मुबलक उपलब्ध असलेल्या सोयाबीनपासून पनीर व मठ्ठा उत्पादित करून ते बाजारपेठेत दाखल करणाऱ्या निमित्तरॉय तोगरे या ग्रामीण भागातील तरूण उद्योजकाने लघु उद्योगात भरारी घेतली आहे़ सध्या औरंगाबाद, नागपूर, वाशिम, लातूर व नांदेडच्या बाजारपेठेत विक्रीला प्रतिसाद मिळत आहे़मराठवाड्यातील शेतकरी सोयाबीन उत्पादनात स्थिरावला आहे़ नांदेड जिल्ह्यात कच्चा माल मुबलक उपलब्ध आहे़ याचा फायदा घेत सोया टोफे (पनीर) व सोया बटर मिल्क ( मठ्ठा ) हे उत्पादन निर्माण करण्याचा निश्चय कंधार येथील तोगरे यांनी केला़ मिळवलेली पदवी व त्यातील ज्ञानाचा उपयोग करत सुक्ष्मातून व्यापक करण्याची ऊर्मी बाळगणाºया तरूणांना त्यांनी पसंतीच्या उद्योगात स्थिर होण्याची जणू प्रेरणाच दिली आहे़शरीराला पोषक अन्नघटक असल्यास निरोगी राहण्याची व जीवन जगण्याची कला साध्य होते़ त्यासाठी तोगरे यांनी सोयाबीन पासून शरीरासाठी पोषक असल्याचे अन्न घटक निर्माण करून त्यातच करिअर करण्याचा संकल्प केला़बारावी उत्तीर्ण होवून २०१२ मध्ये पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये बी़ टेक़ फूड टेक्नॉलॉजी मध्ये पदवी संपादित केली़ त्यानंतर २०१४ मध्ये इंटरनॅशनल स्कूल आॅफ मिलींग टेक्नॉलॉजी म्हैसूर, कर्नाटक येथील सेंटरल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्ट्यूटमध्ये एक वर्षाचा शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण केला़ केरळ राज्यात मुख्य मिलर व प्रयोगशाळा सहायक म्हणून काम केले़तसेच दुबईमध्ये मिलर म्हणूनही काम केले़ त्यानंतर मायदेशी परत येवून स्वत:चा उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला़ त्यासाठी तोगरे यांनी गुजरातमध्ये सोयाबीनप्रक्रिया प्रशिक्षण घेऊन २०१८ मध्ये नांदेड शहरात सोया पनीर टोफे हे उत्पादन सुरू केले आहे़करिअरचा वेगळा मार्गशरीराला पोषक अन्नघटक असल्यास निरोगी राहण्याची व जीवन जगण्याची कला साध्य होते़ त्यासाठी तोगरे यांनी सोयाबीनपासून शरीरासाठी पोषक असल्याचे अन्नघटक निर्माण करून त्यातच करिअर करण्याचा संकल्प केला़ बारावी उत्तीर्ण होवून २०१२ मध्ये पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये बी़ टेक़ फूड टेक्नॉलॉजीमध्ये तोगरे यांनी पदवी संपादित केली़ त्यानंतर २०१४ मध्ये इंटरनॅशनल स्कूल आॅफ मिलींग टेक्नॉलॉजी म्हैसूर, कर्नाटक येथील सेंटरल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्ट्यूटमध्ये एक वर्षाचा शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण केला़
पनीर, मठ्ठा उत्पादनातून रोजगारनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:36 AM
मराठवाड्यात मुबलक उपलब्ध असलेल्या सोयाबीनपासून पनीर व मठ्ठा उत्पादित करून ते बाजारपेठेत दाखल करणाऱ्या निमित्तरॉय तोगरे या ग्रामीण भागातील तरूण उद्योजकाने लघु उद्योगात भरारी घेतली आहे़ सध्या औरंगाबाद, नागपूर, वाशिम, लातूर व नांदेडच्या बाजारपेठेत विक्रीला प्रतिसाद मिळत आहे़
ठळक मुद्देसोयाबीनपासून निर्मिती : कंधारच्या तरुणाने बेरोजगारांना दाखविली दिशा