कोरोनामुळे देशात अन् राज्यात लाॅकडाऊन लागला. परिणामी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. त्याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. दीड वर्ष बंद राहिलेल्या बससेवेमुळे एसटी आर्थिक संकटात सापडली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार करण्याएवढे उत्पन्नही मिळत नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. तसेच निवृत्तिधारकांची देयकेही थकली आहेत.
एसटीमध्ये राहून प्रवाशांची सेवा केली. अतिशय कमी पगारावर एसटीतील चालक, वाहक काम करतात. परंतु, त्यांना कर्तव्यावर असतानाही सुखाने आयुष्य जगता येत नाही. अन् सेवानिवृत्तीनंतरही फरफट संपत नाही. यापेक्षा दुर्दैव ते काय.
- रामकिशन पाटील
सेवानिवृत्तीच्यावेळी एसटीकडून मान-सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात. परंतु, जे चालक, वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांची थकीत देयके, शिल्लक रजेची रक्कम, ग्रॅच्युइटीची रक्कम आदी मिळविण्यासाठी खेटे मारावे लागतात. - एस. एस. मोरे
एसटी महामंडळात काम करणाऱ्या महिला कर्मचारी असो की सेवानिवृत्त कर्मचारी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेकडून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो.
- शीला नाईकवाडे
एसटी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचीच भूमिका प्रशासनाची राहिली आहे. तांत्रिक बाबीमुळे काही जणांची देयके रखडली असतील. परंतु, तिही लवकर अदा करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळेलच.
- संजय वावळे, अधिकारी