चौकट- एकालाही ठोठावला नाही दंड
रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडविल्या प्रकरणात शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यात अशाप्रकारे कोणालाही दंड किंवा शिक्षा झाल्याचे दिसून येत नाही. या कायद्याबाबत अनेक कर्मचारी आणि वाहनधारकही अनभिज्ञ आहेत. त्याचा त्रास मात्र अत्यवस्थ रुग्णांना होतो.
चौकट- रुग्णवाहिकेत अत्यवस्थ रुग्ण असल्यानंतर आम्ही अंबर दिवा लावतो. मोठ्याने हॉर्न वाजवितो. रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविणे हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु, शहरात ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडावे लागते, अशी प्रतिक्रिया महेश पवार यांनी दिली.
चौकट- शहरात विशेष करून कलामंदिर, आयटीआय चौक, वजिराबाद चौक या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिकांना रस्ता मिळत नाही. अनेक जण बेशिस्तपणे वाहने चालवितात, त्यामुळे कोंडीत भरच पडते.