यावेळी लसीकरण राबविण्यासाठी योग्य नियोजन केले असल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व आरोग्य टीमचे अभिनंदन करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
एकूण ६११ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. ज्यात सीआरपीएफच्या ३०७ अधिकारी व सैनिकांना लस देण्यात आली आहे.
कोविडमुळे सैनिकांच्या प्रशिक्षणात अडथळा निर्माण झाला होता; परंतु जवानांना कोर्सच्या कामकाजाविषयी वेळोवेळी ऑनलाइन माहिती देण्यात आली. या महिनापासून मैदानावर प्रशिक्षण शुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीटीसी सीआरपीएफ कमांडर लीलाधर महारानिया, सीएमडी डॉ. डी. के. मिश्रा, डॉ. मोहम्मद सरफराज, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य व्यवस्थापक डॉ. दिलीप फुगारे, डॉ. कपिल जाधव, डॉ. स्मिता सावंत, संजय कोलते, ईश्वर पिन्नलवार, शेख इरफान, अमोल टेकले, अब्दुल रझाक उपस्थित होते.