नांदेड : महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांना महासभेने सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती दिली होती़ त्यानंतर आयुक्तांनी त्यांची पदोन्नती रद्द करीत त्यांना मूळ पदावर आणले होते़ याबाबत शासनाने १५ मार्च रोजी आदेश काढून अधिकाऱ्यांची पदोन्नती कायम ठेवत त्यांची शैक्षणिक अर्हता तपासून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत़महापालिकेतील प्रकाश येवले, संजय जाधव आणि अविनाश अटकोरे यांना महासभेने सहाय्यक आयुक्त या पदावर बढती दिली होती़ त्यानंतर या पदोन्नतीच्या विरोधात काही जणांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या़ या तक्रारीनंतर आयुक्त लहुराज माळी यांनी या अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती रद्द करीत त्यांना मूळ पदावर आणले होते़त्यामुळे या तिन्ही अधिका-यांना मोठा धक्का बसला होता़ त्यानंतर अधिकाºयांनी याबाबत शासनाकडे दाद मागितली होती़ त्यावर १५ मार्च रोजी शासनाचे आदेश धडकले़ ५ एप्रिल १९९९ अन्वये सहाय्यक आयुक्त पदासाठी शैक्षणिक अर्हता नमदू केलेल्या तीन पदांसाठी आहे़ ती उर्वरित सर्व सहाय्यक आयुक्त पदासाठी लागू आहे किंवा कसे? तसेच सहाय्यक आयुक्त संवर्गातील पदोन्नतीचे पदे व सरळसेवेची पदे यानुसार शैक्षणिक अर्हता तपासणी करुन तसा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे महापालिकेकडून आता सहाय्यक आयुक्तांच्या शैक्षणिक अर्हतेची तपासणी होणार आहे़विशेष म्हणजे, यातील प्रकाश येवले हे जानेवारी महिन्यातच सेवानिवृत्त झाले आहेत़ तर संजय जाधव आणि अविनाश अटकोरे हे दोघेजण महापालिकेत कार्यरत आहेत़दरम्यान, महापालिकेत यापूर्वीही दिलेल्या पदोन्नतीबाबत अशाचप्रकारे वादंग उठले होते़ तर दुसरीकडे आकृतिबंधाचा विषयही बरेच दिवस चर्चेत होता़ यामध्ये बरेच राजकारण सुरु होते़ काही जणांनी थेट मंत्रालयात तक्रारी केल्या होत्या़नांदेडकरांवर ‘अ’ दर्जाचा कर चुकीचानांदेड वाघाळा महापालिकेला ‘ड’ दर्जा असताना नागरिकांकडून मात्र ‘अ’ दर्जाचा कर वसूल केला जात आहे़ या जाचक करात सुधारणा केल्यास टॅक्स कृती समिती न्यायालयाचा दरवाजा ठोठावेल, असा इशारा माजी आ़डॉ़डी़आऱदेशमुख यांनी दिला आहे़ त्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे़ महापालिका आयुक्तांनी नांदेडकरांवर एकसूत्र पद्धतीने मालमत्ता कर आणि घरपट्टी लावली आहे़ ती मुंबईच्या धर्तीवर आहे़ नांदेड महापालिका ‘ड’ वर्गात मोडते. त्यामुळे जादा लावलेला कर कमी करावा आणि गत चार वर्षांत वसूल केलेला कर परत द्यावा़ महापालिका सध्या चार दिवसांआड पाणी देत आहे़ परंतु, पाणीकर मात्र पूर्ण वसूल करण्यात येतो़ याबाबत मालमत्ताधारकांची लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे़ असेही निवेदनात नमूद केले आहे़ निवेदनावर डॉ़डी़आऱदेशमुख, अॅड़राणा सारडा, नारायण पुय्यड, संभाजी पाटील पाटोदेकर, बाबा डोकोरे यांच्या स्वाक्षºया आहेत़
मनपा सहाय्यक आयुक्तांच्या शैक्षणिक अर्हतेची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:33 AM