कंधारः महिला-मुलीवर अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कायदा व सुरक्षिततेच्या बाबतीत शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत बिलोली येथील गतिमंद मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्येचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत मामा मित्र मंडळाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे १४ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी] पीडित मुलीच्या कुटुंबाना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मामा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती गायकवाड, बालाजी कांबळे, निरंजन वाघमारे, उद्धव वाघमारे, पद्माकर बसवंते, किशोर बसवंते, पृथ्वीराज बसवंते, साईनाथ मळगे, अमोल वाघमारे, राजकुमार केकाटे, विजय वाघमारे, सुरेश कल्हाळीकर, मनोज कांबळे, साईनाथ वाघमारे, भास्कर कदम,सोपान कांबळे आदीची उपस्थिती होती.
जनआक्रोश मोर्चात संयुक्त ग्रुप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सत्यशोधक समाज पक्ष, एम आय एम, प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड, राजमुद्रा ग्रुप आदी विविध पक्ष व सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला.