शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

पिशव्या निर्मितीसाठी मुदतवाढीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:01 AM

प्लास्टिकबंदी निर्णयानंतर शहरात कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती व्हावी यासाठी नांदेड महापालिकेच्या वतीने मोफत पिशव्या वाटप करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देमहापालिका : कापडी पिशव्यांची जनजागृती होणार कधी ?

नांदेड : प्लास्टिकबंदी निर्णयानंतर शहरात कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती व्हावी यासाठी नांदेड महापालिकेच्या वतीने मोफत पिशव्या वाटप करण्यात येणार आहेत. प्लास्टिकबंदी निर्णयाला सहा महिने उलटल्यानंतरही या प्लास्टिक पिशव्या महापालिकेला प्राप्त झाल्याच नाहीत. उलट महापालिका प्लास्टिक पिशव्या करणाऱ्या ठेकेदारास आणखी मुदतवाढ देण्याची तयारी महापालिकेने केली आहे.प्लास्टिकबंदी निर्णयानंतर कापडी पिशव्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड महापालिकेला जिल्हा नियोजन समितीमार्फत सव्वा कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतला. या निर्णयानुसार हे काम बचतगटांना दिले जाईल, असे खुद्द कदम यांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम ठेकेदारांच्या घशात घालण्यात आले. सप्टेंबर २०१८ मध्ये ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. पिशव्यासाठी कपड्याचा पुरवठा करण्याचे काम गिरीराज सेल्स कार्पोरेशनला तर कापडी पिशव्या शिवून देण्याचे काम गिरीराज फाऊंडेशनला दिले होते.४५ बाय ३०, ३० बाय ३० आणि ४५ बाय ४५ या आकाराच्या पाच लाख पिशव्या शिवण्याचे काम सदर ठेकेदारास दिले होते. मात्र प्रत्यक्षात आजघडीला एक हजार पिशव्याही तयार झाल्या नाहीत. महापालिकेने कामाच्या संथगतीबाबत सदर ठेकेदारास नोटीसही बजावली आहे. ठेकेदाराकडून त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उलट मुदत वाढवून देण्याची मागणी ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. ही मागणी मान्य करण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नसल्याने आता सदर ठेकेदारास मुदत वाढवून देण्याची तयारी केली जात आहे.संथगतीने सुरु असलेल्या या कामामुळे शहरवासियांना पिशव्या कधी प्राप्त होतील? हा प्रश्न पुढे आला आहे. त्याचवेळी मनपा प्रशासनाकडून ठेकेदारांना दिली जाणारी मुदतवाढही आश्चर्यकारकच मानली जात आहे.जनजागृतीच्या होर्डिंग्जचे कामही रखडलेलेचप्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कापडी पिशव्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात होर्डिंग लावण्यात येणार आहेत. त्यासह या होर्डिगद्वारे पर्यावरण जनजागृतीही केली जाणार आहे. यासाठी महापालिका २५ लाख रुपये खर्च करणार आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी या कामाला निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. प्रत्यक्षात मात्र या कामाला सुरुवातच झाली नाही.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी