नांदेड : मतदारांनी गोपनियतेचा भंग करु नये असा कायदा आहे़ परंतु गुरुवारी झालेल्या लोकसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यात अनेकांनी सर्रासपणे गोपनियतेचा भंग करीत कोणत्या उमेदवाराला मत दिले याची छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मीडियावर झळकविली़ दिवसभर त्यासाठी स्पर्धाच लागली होती़ या प्रकरणात फक्त मांडवीमध्ये एक गुन्हा नोंद झाला आहे़मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेवून जाण्यास तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास मनाई आहे़ मतदानाच्या गोपनियतेचा भंग होवू नये यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर तशी खबरदारी घेतली जाते़ मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही तशा सूचना असतात़ परंतु, गुुरुवारी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारांनी या नियमांना तिलांजली दिली़ नेत्यांना आपल्या स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी अनेकांनी सर्रासपणे मतदान केंद्रात मोबाईल नेत मतदान करीत असल्याचे ईव्हीएमचे छायाचित्र काढले़ तर काहींनी त्याहीपुढे जात फेसबुक लाईव्ह केले़ त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर या क्लीप व्हायरल करण्यात आल्या़ दिवसभर त्यासाठी स्पर्धा लागली होती़ काही जणांच्या हातून नकळत ही चूक झाली़ तर काही पक्षाच्या नेत्यांनीही गोपनियतेचा भंग केला़ परंतु याबाबत नांदेड जिल्ह्यात केवळ मांडवी येथे एक गुन्हा दाखल झाला़ मांडवीत हिंगोली लोकसभा निवडणुकीत चावी या चिन्हावर मतदान करीत असलेले छायाचित्र बळीराम पाटील मांडवी या व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकण्यात आले होते़ याप्रकरणी प्रफुल्ल भिकू राठोड यांनी तक्रार दिली़ त्यावरुन एका तरुणावर गुन्हा नोंदविण्यात आला.
नेत्याच्या प्रेमापोटी फेसबुक लाईव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:37 AM
मतदारांनी गोपनियतेचा भंग करु नये असा कायदा आहे़ परंतु गुरुवारी झालेल्या लोकसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यात अनेकांनी सर्रासपणे गोपनियतेचा भंग करीत कोणत्या उमेदवाराला मत दिले
ठळक मुद्देमतदानाच्या गोपनीयतेचा सर्रास भंग