शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

नीट, जेईईमुळे बारावीच्या निकालात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:54 AM

विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़

ठळक मुद्देतीन वर्षापासून नांदेड दुसऱ्या क्रमांकावर गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३़४ टक्क्यांनी लागला निकाल कमी

नांदेड : विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़बारावीच्या निकालाची घसरण कमी झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे़ मागील काही वर्षात निकालाचा आलेख उंचावला होता़ मात्र तो आता खाली आल्याचे दिसून येत आहे़ यामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते़ विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हीची ग्रुपींग होईल एवढेच ध्येय समोर ठेवून अभ्यास करतात़ या विद्यार्थ्यांची एनईईटी व जेईई मेन अ‍ॅडव्हॉन्स तयारीकडे अधिक लक्ष असते़ एकीकडे ग्रुपींग करण्यासाठी बोर्डाची तयारी करणे तर दुसरीकडे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर अधिक भर देणे, हा प्रकार सुरू झाला असल्याचे विद्यार्थी समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांनी सांगितले़नांदेड जिल्हा दुस-या क्रमांकावरजिल्ह्याचा निकाल यंदा ८६़२० टक्के लागला असून ८२़६३ टक्के मुलांनी तर ९०़८६ टक्के मुलींनी बाजी मारली आहे़ जिल्ह्यातून ३६ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३६ हजार ४४ जणांनी परीक्षा दिली होती़ त्यामध्ये ३१ हजार ७० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ २०१६ मध्ये ८४़९९ टक्के, २०१७ मध्ये ८८़५४ टक्के, २०१८ मध्ये ८९़३४ टक्के निकाल लागला होता़ यावर्षी मात्र ८६़२० टक्क्यावरच समाधान मानावे लागले़ निकालाचा हा आलेख गत दोन वर्षापेक्षा खाली आला आहे़ लातूर विभागात नांदेड, लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे येतात़ मागील तीन वर्षाची दुस-या क्रमांकाची परंपार यावर्षी सुद्धा नांदेड जिल्हा विभागाने राखली़ यंदा शंभर टक्के निकाल लागणा-या महाविद्यालयांची संख्याही कमी झाली आहे़ जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे़ मात्र अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या ही नगण्य आहे़ त्यामुळे शंभर टक्के निकालाचे यश म्हणावे तेवढे समाधान देणारे नाही़ नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल नीट व जेईईकडे वाढल्याने विद्यार्थी बारावीचा अभ्यास गांभिर्याने करताना दिसत नाहीत़ अनेक विद्यार्थी नावालाच महाविद्यालयात प्रवेश घेतात़ काही महाविद्यालयात तासिका होत नाहीत़ केवळ प्रात्यक्षिक परीक्षा व नंतर मुख्य परीेक्षेची तयारी करून घेतात़ नीट परीक्षेसाठी वेळ राखून बारावीचा अभ्यास केला जात असल्यानेच निकालात घट झाली आहे़

टॅग्स :NandedनांदेडHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी