पोलीस वाहनाची दुरवस्था
कुंडलवाडी - येथील पोलीस ठाण्यातील (एमएच २६ आर ४१८) या पोलीस वाहनाची दुरवस्था झाली आहे. धर्माबादेतून दोन आरोपींना घेऊन येत असताना आंबेडकर नगर कुंडलवाडी येथे या चालत्या वाहनाचे मागचे टायर फुटले. सुदैवाने काही अघटित घडले नाही.
जिजाऊ व विवेकानंद जयंती
नरसीफाटा - मरवाळी तांडा येथील माध्यमिक आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्राचार्य बी. व्ही. बेटकर, एस. बी. परसुरे, बी. व्ही. तेलंग, एस. एस. जाधव, एस. जी. मेहत्रे, एन. एस. गबाळे, एस. जी. राठोड, पी. बी. जाधव, जी. आर. हाके, प्रा. कागडे, प्रा. स्वामी, प्रा. सूर्यवंशी उपस्थित होते.
तरुणाचा अपघाती मृत्यू
नायगाव - नायगाव तालुक्यातील काेपरा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १२ जानेवारी रोजी घडली. अंकुश डोईबळ व शिवकुमार हे १२ जानेवारी रोजी दुचाकीवरुन जात होते. होटाळा गावानजीक दुचाकी उभी करून अंकुश हे लघुशंकेला गेले तर शिवकुमार दुचाकीजवळ उभे होते. याच दरम्यान (एमएच २६ - बीसी ३४४४) क्रमांकाच्या वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने शिवकुमार यांना धडक दिली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
आरोग्य उपकेंद्राचे काम अर्धवट
नायगाव - तालुक्यातील कृष्णूर येथील आरोग्य उपकेंद्राचे काम अर्धवट झाले आहे. मागील सहा ते सात महिने काम ठप्प आहे. गुत्तेदार कुठे गायब झाला, असा सवाल केला जात आहे.
बीएसएनएलची सेवा ठप्प
कुंडलवाडी - शहरातील पोस्ट ऑफिसमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत असल्याने पोस्ट ऑफिसचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.
साई मंदिरात कार्यक्रम
नायगाव - येथील पानसरे नगरात श्री साईबाबांची मूर्ती स्थापना व कलशारोहण वर्धापन सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. कीर्तनकार विक्रम महाराज यांचे ज्ञानेश्वरी चरित्र व साईबाबा चरित्रावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला नांदेडचे नगरसेवक आनंद चव्हाण, माधव बेळगे, पालिका उपाध्यक्ष विजय चव्हाण, डॉ. विश्वास चव्हाण, रवींद्र चव्हाण, प्रल्हाद पाटील, पांडुरंग चव्हाण, दत्तात्रय लोकमनवार, गजानन चौधरी आदी उपस्थित होते.
कपाटे यांना पदोन्नती
माहूर - येथील पोलीस जमादार गंगाधर कपाटे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. तसेच पोलीस नाईक प्रेमसिंग राठोड यांना जमादार तर पोलीस काॅन्स्टेबल विजय आडे यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाली आहे. या सर्वांचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, अण्णासाहेब पवार आदींनी स्वागत केले.
जिजाऊ जयंती साजरी
मुदखेड - तालुक्यातील चिलपिंपरी येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तराम पाटील होते. भीमराव गाडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी माजी सरपंच मारोती पाटील, संजय कोलते, आनंदा गाढे, ज्ञानेश्वर गाढे, केशव गाढे, गोविंद पाटील, तानाजी गाढे, विनायक गाढे, संभाजी गाढे, दिगांबर गाढे, माधवराव गाढे, जयदीप पवार, मोहन कोलते, प्रताप कोलते आदी उपस्थित होते.