कोविड सेंटरला शिंदे यांची भेट
लोहा - लोहा येथील कोविड सेंटरला सामाजिक कार्यकर्ते आशा शिंदे यांनी भेट देऊन रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी अधीक्षक डॉ. बारी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, प्राचार्य पत्तेवार, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधा देण्याची मागणी केली. याप्रसंगी योगेश पाटील, नंदनवनकर, शुभम कदम, अशोक सोनकांबळे आदी उपस्थित होते.
मुक्रमाबादकर झाले बेफिकीर
मुक्रमाबाद - नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. तथापि मुक्रमाबादकर याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. दुकाने उघडी आहेत. दुकानांवर गर्दी होत आहे. अनेकांच्या तोंडावर मास्क नाही. सुरक्षित अंतर नसल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
अर्धे शटर सुरू
लोहा - लोहा तालुक्यातील मारतळा परिसरातील कापड, बांधकाम साहित्याची दुकाने उघडी आहेत. लॉकडाऊन पाळायला काही जण नकार देत आहेत. दुकान बाहेरून बंद असल्याचे दाखविले जाते. पाठमोरे मात्र दुकान सुरू असते. त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मुरुमाची अवैध वाहतूक
नायगाव - बरबडा व परिसरात मनूर येथे नदीच्या काठावर मुरुम व मातीचे अवैध उत्खनन होत आहे. याबाबतची माहिती महसूलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र काहीही कारवाई होत नाही. शासनाचे यात मोठे नुकसान होत आहे. संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
नरसीमध्ये लॉकडाऊनला प्रतिसाद
नरसीफाटा - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या लॉकडाऊनला नरसीत चांगला प्रतिसाद मिळाला. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना रामतीर्थचे सपोनि महादेव पुरी, अनिल रिंदकवाले, क्षीरसागर, पंडित, राठोड यांनी चांगला चोप दिला. अत्यावश्यक आरोग्य सेवा व औषधी दुकाने एवढीच सुरू आहेत.
जुन्या बसस्थानक येथे मोफत पाणी
बिलोली - ऑल इंडिया तंजीम-ए-इन्साफ शाखा बिलोलीच्या वतीने लॉकडाऊन संपेपर्यंत जुने बसस्थानक येथे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. २५ रोजी सपोनि केंद्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सहायक फौजदार वाघमारे, अभियंता राम पवार, विनायक जाधव, राम गादगे, लईक सिद्दीकी, प्रदीप भिल्लोड, आरोग्य कर्मचारी तोटावार, शेख खमर यांच्यासह तंजीमचे तालुकाध्यक्ष ए.जी. कुरेशी, कार्याध्यक्ष वलीयोद्दीन फारुखी, सचिव सय्यद रियाज, मौलाना अहमद बेग, शेख फारुख, मौलाना मोबीन खान, महबुब शेख फौजी, सुनील जेठे आदी उपस्थित होते.
निराधारांचे मानधन रखडले
नायगाव - नायगाव तालुक्यातील अनेक गावातील निराधार, वयोवृद्ध, अपंगांची गेल्या तीन महिन्यापासून मानधन रखडले. कोरोनाचा फटका, नंतर आचारसंहितेचे निर्बंध यामुळे वेळेवर मानधन मिळाले नाही. आता तर जिल्हाभरात कोरोना संकट वाढल्याने यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली आहे. त्यामुळे निराधारांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे.
गायकवाड काँग्रेसमध्ये
बिलोली - सामाजिक कार्यकर्ते शिवा गायकवाड यांनी २६ मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, नगराध्यक्ष मारोती पटाईत, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष फेरोज खान, नगरसेवक प्रकाश पोवाडे, अमजद चाऊस, जावेद कुरेशी, वलीयोद्दीन फारुखी, गंगाधर सोनकांबळे, मुन्ना पोवाडे, संदीप कटारे, किरण लघुळकर, मसुद देसाई, प्रकाश पाटील, सुनील सूर्यवंशी आदी होते.
जारीकोट येथे लसीकरणाला प्रारंभ
धर्माबाद - जारीकोट येथील आरोग्य उपकेंद्रात ज्येष्ठ नागरिकास कोविडची लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे, गोविंदराव रामोड, गंगाधर रामोड, लक्ष्मीबाई कोसकेवार, लिंगोजी रामोड, श्रीरंग रामोड आदी उपस्थित होते.