महिलेची आत्महत्या
नांदेड : मुखेड तालुक्यातील कबनूर येथे १७ मे रोजी एका २५ वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कबनूर येथील श्रीदेवी संभाजी पांचाळ या महिलेचे गावातील मारोती मंदिराजवळील विहिरीत १७ मे रोजी उडी मारून आत्महत्या केली. सरपंच रामदास वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून मुक्रमाबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मारहाणप्रकरणी गुन्हा
नांदेड : ओटा बांधकामाला विरोध का केलास म्हणून एका शेतकऱ्यास काठीने मारहाण केल्याची घटना बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे १८ मे रोजी घडली. आरोपींनी शशिकांत रामकिशन पोतदार यांना घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली. तसेच काठीने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोतदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.