लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : शेतकऱ्यांची कर्जमाफी गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित करुन बोंडअळी, पीकविम्याची रक्कम अद्याप शेतकºयांना मिळाली नाही, तर आॅनलाईन खरेदीत नियोजन नसल्यामुळे चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात आल्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नव्याने १ कोटी ४१ लक्ष खर्च करून बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आ. अमिता चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यानंतर शेतकरी निवासस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात खा. चव्हाण बोलत होते.मंचावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, गणपतराव तिडके, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जि.प.सदस्य प्रकाश देशमुख, बाळासाहेब रावणगावकर, आप्पाराव सोमठाणकर, व्यंकटराव कल्याणकर, निबंधक के. एस. पावडे, केशवराव इंगोले, माधवराव कदम, पप्पू पाटील कोंडेकर, गुलाबराव चव्हाण, गोविंदबाबा गौड, सभापती जगदीश पाटील भोसीकर, शेख युसूफ, मनोज गिमेकर, उपसभापती गणेश राठोड उपस्थित होते.यावेळी खा.चव्हाण म्हणाले की, आधारभूत किमतीवर शेतकºयांच्या मालाचे भाव पडल्यास हमी भावाप्रमाणे शासनाने खरेदी करणे आवश्यक असताना शासन केवळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोप केला. भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा करणारे हे ज्यांची सत्ता असेल त्यांच्याकडे जावून 'जिसका राज उसके पूत बनतात'. असा टोला लगावत मीही युथ काँग्रेस चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता असून चव्हाणांची सभा उधळण्याइतपत ताकद विरोधकांत नाही, असे त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. भोकर ते नांदेड या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून तिकडे या कार्यकर्त्यांनी ओरडणे आवश्यक आहे, अशा ओरडणाºया कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धडा शिकवतील, असा इशारा देवून नांदेड जिल्ह्यात सर्व तालुक्यांत पीकविमा मंजूर झाला. परंतु, भोकर मतदारसंघातील अधिकची आणेवारी काढून जाणूनबुजून वंचित ठेवल्याचा आरोपही खा. चव्हाण यांनी केला. प्रारंभी प्रास्ताविक सभापती जगदीश पाटील भोसीकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये तर रामचंद्र मुसळे यांनी आभार मानले.इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत भाजपा, सेना नेत्यांची नावे नसल्याने पक्षीय भेद करण्यात आल्याचा आरोप करीत भाजपा- सेनेच्या संचालक व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिला होता. भूमिपूजन सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून सोडून दिले. पोलीस निरीक्षक आर.एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्य सरकारमुळे शेतकरी संकटात- अशोकराव चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:46 AM