मुखेड : मुखेड तालुक्यात सततच्या तीन वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतक-यांचे चांगलेच कंबरडे मोडले असून तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शिरुर द. येथील एका शेतक-याने तुरीच्या उभ्या पिकात जनावरे सोडून 'विकास साखर कारखाना'कडे ऊस ओढण्यासाठी ६० हजार रूपयाची उचल घेतली आणि पत्नीसह आपले बैल व गाडी घेऊन साखर कारखान्याला गेला आहे.शिवाजी विश्वनाथ कराळे, असे शेतक-याचे नाव असून, आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी कराळे यांची. त्यांना २ एकर माळरान जमीन. यातून कुंटुंबाची गुजराण होईना. शेवटी त्यांनी शिरुर शिवारातील मुखेड- जांब बु. राज्य मार्ग रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर कवटीकवार यांची ३० एकरच्या जवळपास जमीन ५० हजार रुपये देवून खंडगुत्ते पद्धतीने घेतली. मागील दोन वर्ष कोरडा दुष्काळात गेले. यंदा तर भयानक अवस्था आहे. शेतीसाठी कराळे यांनी ५० हजाराची बैलजोडी विकत घेतली. पेरणीसाठी ५० ते ६० हजारांचे बी-बियाणे, खत, फवारणीवर खर्च केला. शेतात ५ बॅग सोयाबीनला ८ क्विंटल उत्पन्न निघाले.१० बॅग ज्वारीला २० पोते ज्वारी झाली. उडीद २ क्विंटल, मुग २ क्विंटल झाले तर तुरीला ना फुल ना चट्टा. शेवटी कंटाळून कराळे यांनी उभ्या तुरीत जनावरे सोडली. कराळे यांच्यावर मोठे कर्ज झाले. एकूणच यासर्व बाबींना वैतागून त्यांनी लातूरच्या पुढे असलेल्या 'विकास साखर कारखाना'कडे ऊस ओढण्यासाठी ६० हजार रूपयाची उचल घेतली आणि पत्नीसह आपले बैल व गाडी घेऊन साखर कारखान्याचा मार्ग स्वीकारला. त्यांची दोन्ही मुले पुण्यास कामाला गेली आहेत.ही व्यथा एका शेतकºयाची असली तरी तालुक्यातील प्रत्येक शेतकºयांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. मुखेड तालुक्यात मागील तीन वर्षांत ५० च्या आसपास शेतकºयांनी कर्जबाजारी, नापीकीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या नोंदी तहसीलमध्ये आहेत.
- शिवाजी विश्वनाथ कराळे, असे शेतकºयाचे नाव असून, आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
- संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी कराळे यांची. त्यांना २ एकर माळरान जमीन. यातून कुंटुंबाची गुजराण होईना.
- शेवटी त्यांनी शिरुर शिवारातील मुखेड- जांब बु. राज्य मार्ग रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर कवटीकवार यांची ३० एकरच्या जवळपास जमीन ५० हजार रुपये देवून खंडगुत्ते पद्धतीने घेतली.