नांदेड : जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पीक कर्ज वितरण आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार डी. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेश धुर्वे, तसेच जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक पी. एन. निनावे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, कृषी उपसंचालक माधुरी सानवणे तसेच विविध बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतक-यांना त्रास होऊ नये, यासाठी बँकांकडे दत्तक असलेल्या गावांची यादी शाखेत दर्शनी भागात लावावी, कर्ज मागणी अर्जासोबत जोडाव्या लागणा-या कागदपत्रांची यादी सर्व बँक शाखांसाठी एकसमान असावी, तसेच त्याबाबतचे परिपत्रक अग्रणी बँकेने काढावेत आणि शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येवू नये. बँक कर्मचा-यांनी शेतक-यांशी सौजन्याची वागणूक देण्यात यावी. पीक कर्ज वितरण गतीने पूर्ण करण्यासाठी बँकांनी गावोगावी पीककर्ज वितरण मेळावा आयोजित करण्याबाबतही सूचनाही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिल्या.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेव्यतिरिक्त अन्य बँकांचे कर्ज वाटप उद्दिष्टांच्या तुलनेत खूप कमी आढळल्याने नाराजी व्यक्त करीत एकूण उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ १३.६६ टक्के म्हणजे २६८.७५ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. यात सहकारी क्षेत्रातील बँकांचा वाटा ९४.८६ टक्के असून त्यांनी १६९.४२ कोटींचे कर्ज वाटत केले आहे. ग्रामीण बँकेने उद्दिष्टाच्या १३.५९ टक्के (३७.६६ कोटी ) इतके तर खाजगी क्षेत्रातील बँका पीक कर्जवाटपात खूप मागे आहेत. त्यांनी केवळ उद्दिष्टाच्या २.८३ टक्के (३८.४६ कोटी ) इतकेच कर्ज वाटप केले आहे.यावेळी बैठकीस उपस्थित आ. डी.पी.सावंत, आ. वसंतराव चव्हाण यांनी देखील पीक कर्ज वितरण अनुषंगाने संबंधित अधिकाºयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.सहायता केंद्राची स्थापनाशेतक-यांच्या तक्रारींचा गतीने निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्ज मदत/सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली असून १०७७ या टोल फ्री व ०२४६२-२३५०७७ या कार्यालयीन क्रमांकावर पीक कर्ज अनुषंगाने संपर्क करता येणार आहे.
शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:30 AM
जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पीक कर्ज वितरण आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पीककर्ज वाटपासाठी गावोगावी वितरण मेळावे घेण्याची सूचना