युती सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त - चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:29 AM2019-04-06T00:29:24+5:302019-04-06T00:29:57+5:30
भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़
नांदेड : भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़
काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड शहरातील महावीर कॉलनी, विसावानगर, गोकुळनगर या भागात आ़अमिता चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या़ यावेळी रंजना सावंत, मोहिनी येवनकर, प्रीती सोनाळे, कविता गड्डम, अर्चना वरे, पुष्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़
बैठकीत मार्गदर्शन करताना आ़चव्हाण म्हणाल्या, अशोकराव चव्हाण यांना नांदेडचा इतिहास व भूगोल माहिती आहे़ नांदेडचा विकास हाच ध्यास घेवून ते कार्यरत आहेत़ अशोकराव चव्हाण यांच्या धोरणामुळेच नांदेडला आज मुबलक पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळेच या भागाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी केले़
यावेळी रंजना सावंत म्हणाल्या, जालना, परभणी, लातूर आदी जिल्ह्यात पाणी विकत घ्यावे लागत आहे़ नांदेडमध्ये मात्र चव्हाणांमुळे पाणी मुबलक उपलब्ध आहे. भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे़ व्यापार ठप्प झाले आहेत़ काँग्रेस सत्तेवर आली तर पुन्हा सामान्यांचा विकास साधला जाईल.
यावेळी नेहा कासलीवाल, पारस कासलीवाल, कविता गड्डम, प्रा़सिद्दीकी, सुजाता बाहेती यांचीही भाषणे झाली़ या बैठकीस विजय येवनकर, संतोष मानधने, अमित वाघ, नागनाथ गड्डम, परिष कासलीवाल, अनिल कासलीवाल, प्रा़एस़ टी़ सिद्दीकी, बेबीताई कलेवार, कमलाबाई मुदीराज, कोमल जाजू, पद्माताई शर्मा आदींची उपस्थिती होती़