हदगाव (नांदेड ) : पाथरड येथिल एका ३५ वर्षीय शेतकऱ्यांने मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (दि.९ ) रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रकाश पंजाबराव पवार असे शेतकऱ्यांचे नाव असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद प्रकाश पवार यांचा वडगाव येथील रास्तारोको आंदोलनात सहभाग होता. काल रात्री उशिरा आंदोलन संपल्यानंतर त्यांनी घरी कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर त्यांनी घरातील विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पवार यांना एक हेक्टर शेती असुन दोन मूले आहेत. त्यांचा शैक्षणिक खर्च झेपत नसल्याने त्यांना आरक्षण मिळाल्यास मुलांचे शिक्षण मोफत होईल अशी त्यांना आशा होती. मात्र सरकार आरक्षणासाठी चालढकल करत असल्याने ते निराश होते.