अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान दिले असून या अनुदानासाठी ८६ कोटी ९१ लाख ७ हजार २९६ रुपयांचा निधी बँक खात्यात जमा केला आहे. हे दुष्काळी अनुदान आता कधी वाटप होईल, याकडे शेतक-यांचे लक्ष लागले असून खरीप पेरणीपूर्वी हे अनुदान वाटप करण्यासाठी बँकांनी नियोजन करण्याच्या सूचना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात २०१८ मध्ये देगलूर, मुखेड आणि उमरी या तीन तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला होता. या दुष्काळामध्ये देगलूर तालुक्यातील १०८ गावांमधील ५७ हजार ७३७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. मुखेड तालुक्यात १३५ गावांत ७७ हजार ८६४ आणि उमरी तालुक्यात ६३ गावामध्ये ३४ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती. या तीन तालुक्यांत १ लाख ७० हजार ५९२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. याचा फटका तीन तालुक्यांतील १ लाख ५५ हजार ७४१ शेतकºयांना बसला होता. त्यात मुखेड तालुक्यातील सर्वाधिक ७१ हजार १७६ शेतकºयांचा समावेश आहे. देगलूर तालुक्यातील ५४ हजार २३७ आणि उमरी तालुक्यातील ३० हजार ३२८ शेतकरी दुष्काळामुळे होरपळले होते.या दुष्काळी तालुक्यातील बाधित शेतक-यांना मदतीचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे अनुदान वाटप करताना शेती पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेती पिकाच्या नुकसानीबाबत ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर किंवा किमान १ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम तसेच बहुवार्षिक पिकाच्या ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानीबाबत १८ हजार रुपये प्रतिहेक्टर किंवा किमान २ हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतक-यांना वितरीत केली जाणार आहे. हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या शेतकºयांना दिले जाणार आहे.देगलूर तालुक्यातील ५४ हजार २३७ शेतक-यांसाठी ३० कोटी ४ लाख ५२ हजार रुपये अनुदान शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले आहे. मुखेड तालुक्यातील ७१ हजार १७६ शेतक-यांसाठी ४० कोटी ६४ लाख १६ हजार आणि उमरी तालुक्यातील २० हजार ३२८ शेतक-यांसाठी १६ कोटी २३ लाख रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. हा निधी शेतक-यांच्या खात्यातही जमा करण्यात आला आहे.दुष्काळी अनुदान उचलण्यासाठी शेतक-यांची उमरी, देगलूर आणि मुखेड तालुक्यांतील जिल्हा बँकेच्या शाखामधून गर्दी होत आहे. खात्यात अनुदान जमा झाले असले तरी ते उचलण्यासाठी जिल्हा बँकेच्या दुष्काळी तालुक्यांतील शाखामध्ये उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेता शेतक-यांची गर्दी होत आहे. मुखेडचे आ. तुषार राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी जिल्हा बँकेद्वारे वेळेत अनुदान वाटप करण्याच्या सूचना खा. चिखलीकर यांनी केली़
जून अखेरपर्यंत अनुदान वाटप होणारच्शासनाने दुष्काळी अनुदानापोटी ८२ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी दुष्काळी तालुक्यातील शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आतापर्यत २६ कोटी रुपये शेतक-यांनी उचलले आहेत. उर्वरित रक्कमही पेरणीपूर्वी शेतक-यांना उचलता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जून अखेरपर्यंत सर्व रक्कम वितरित होईल-अजय कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती बँक