शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मे महिन्यात मराठवाड्यातील रुग्णसंख्या दीड लाखापुढे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:19 AM

नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या दिवसात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती असून, २ मेपर्यंत मराठवाड्यातील ...

नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या दिवसात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती असून, २ मेपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ५८ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता आरोग्य विभागानेच वर्तविली आहे. रुग्णवाढीमुळे आयसोलेशन, ऑक्सिजन आणि आयसीयू खाटासह व्हेंटीलेटर्स कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्र अनुभवत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, मृत्यूदरही वाढलेला आहे. आरोग्य विभागाने ज्या पाच जिल्ह्यांच्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेडचा मृत्यूदर मागील आठवड्यात १.८२ टक्केवर गेला होता. साप्ताहिक पॉजिटीव्हीटीमध्येही उस्मानाबादसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. उस्मानाबादचा सर्वाधिक ३९.२५ टक्के पॉजिटीव्हीटी रेट होता. तर परभणी ३६.७८ आणि हिंगोलीचा रेट ३६.७० असा आढळला आहे. या तीनही जिल्ह्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच येणाऱ्या दिवसात मराठवाड्यातील सक्रिय रुग्ण संख्या सध्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून २ मेपर्यंत हा आकडा १ लाख ५८ हजाराच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास आयसोलेशन ऑक्सिजन, आयसीयूसह व्हेंटीलेटर्सचीही मोठ्या प्रमाणात कमतरता पडू शकते. आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार रुग्णवाढ झाल्यास मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात १७ हजार ७०० आयसोलेशन खाटा कमी पडतील. तर ८ हजार ६३० ऑक्सिजन खाटासह ११४५ आणखी आयसीयू खाटांची गरज भासू शकते. याबरोबरच २०९ व्हेटीलेटर्स आणखी उपलब्ध करावे लागणार आहेत. आरोग्य विभागाने वर्तविलेला हा अंदाज पाहता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

चौकट.............

रुग्णवाढीचा असा आहे अंदाज...

राज्याच्या आराेग्य विभागाने मराठवाड्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ मेपर्यंत सुमारे १ लाख ५८ हजारांच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. २ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ७३१ असण्याची शक्यता आहे. तर जालना १५ हजार ९५६, बीड १९ हजार ५३६, लातूर ३६ हजार ८९८, परभणी २२ हजार ६३९, हिंगोली ४ हजार ४१९, नांदेड २८ हजार ४० तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ मेपर्यंत १० हजार २७७ पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

सध्याच ऑक्सिजनसह आयसोलेशन खाटा फुल्ल...

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण आयसोलेशन खाटांच्या १७९.३६ टक्के वापर होत आहे. परभणी १४४.९२, हिंगोली ७९.५०, औरंगाबाद ७३.०४, बीड ४६.६७, उस्मानाबाद ४६.२२, लातूर ४४.९३ तर जालना जिल्ह्यातील २७.२८ टक्के आयसोलेशन खाटा भरलेल्या आहेत. हिंगोलीत एकूण खाटांच्या तुलनेत १२६.६७ टक्के व्हेंटीलेटर्स वापरले जात आहेत. तर औरंगाबाद १०४.५७, लातूर ७४.७७, जालना ६०.१६, उस्मानाबाद ४७.६६, बीड १७.३३ तर नांदेड जिल्ह्यात एकूण खाटांच्या तुलनेत १५.३८ टक्के व्हेंटीलेटर्सचा वापर करण्यात येत आहे.