शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

दसरा-दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन; काझीपेट-दादर व्हाया नांदेडच्या २६ फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 7:30 PM

जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित अशी १७ डब्यांची ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी राहील.

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने दसरा व दिवाळी सणाला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काझीपेट-दादर-काझीपेट ही फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या कालावधीत धावणाऱ्या या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या २६ फेऱ्या होतील. जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित अशी १७ डब्यांची ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी राहील.

गाडी क्रमांक (०७१९५) काझीपेट- दादर मार्गे करीमनगर, निझामाबाद, नांदेड, औरंगाबाद ही विशेष गाडी १६, २३ ऑक्टोबर आणि १३, २० आणि २७ नोव्हेंबर रोजी दर बुधवारी काझीपेट स्थानकावरून दुपारी ३.०० वाजता सुटेल. जम्मिकुंता, पेद्द्पल्ली, करीमनगर, लीगामपेट, जागीत्याल, कोराटला, मेत्पल्ली, अर्मूर, निझामाबाद, बासर, धर्माबाद, उमरी, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण मार्गे दादर स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ मिनिटाला पोहोचेल.

गाडी क्रमांक (०७१९६) दादर-काझीपेट मार्गे औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद व करीमनगर या मार्गाने जाणारी ही विशेष गाडी १७ व २४ ऑक्टोबर व १४, २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी दादर येथून दर गुरुवारी दुपारी ३.२५ मिनिटाला सुटेल. आलेल्या मार्गानेच दुसऱ्या दिवशी काझीपेट येथे दुपारी ४.०० वाजता पोहोचेल.

व्हाया बल्लारशागाडी क्रमांक (०७१९७) काझीपेट-दादर ही स्पेशल ट्रेन बल्लारशा, पिंपळकुट्टी, आदिलाबाद, किनवट, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाईल. ही ट्रेन १२, १९ व २६ ऑक्टोबर आणि २, ९, १६, २३ व ३० नोव्हेंबर रोजी दर शनिवारी काझीपेट येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल. जम्मिकुंता, पेद्द्पल्ली, मंचीर्याल, बेल्लाम्पल्ली, सिरपूर कागझनगर, बल्लारशा, चंद्रपूर, भांडक, वणी, कायेर, लीन्ग्ती, पिंपळकुट्टी, आदिलाबाद, किनवट, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण मार्गे दादर स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ मिनिटाला पोहोचेल. तर गाडी क्रमांक (०७१९८) दादर-काझीपेट ही गाडी १३, २० व २७ ऑक्टोबर तथा ३, १०, १७ व २४ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी २०२४ रोजी दादर येथून दर रविवारी दुपारी ३.२५ मिनिटाला सुटेल. आलेल्या मार्गानेच काझीपेट येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.

 

टॅग्स :NandedनांदेडAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीDiwaliदिवाळी 2023