चाचण्यांची संख्या रुग्णसंख्या पॉझिटिव्हिटी दर
१ एप्रिल ४०५७ ९९५ २४.५२
८ एप्रिल ५२६३ १४५० २७.५५
१५ एप्रिल ४३५६ १२८८ २९.५६
२१ एप्रिल ४५४९ १३७२ ३०.१६
२८ एप्रिल ३६६२ ७६९ २०.९९
१ मे २६१२ ५८४ २२.३५
२ मे २६६२ ५१८ १९.४५
३ मे २७०८ ७०२ २५.९२
चौकट---------------
अँटिजेन किटचा जिल्ह्यात तुटवडा
आरटीपीसीआरच्या तुलनेत अँटिजेन तपासणीचा अहवाल लवकर मिळतो. त्यामुळे बाधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करता येतात. शिवाय अहवाल आल्याने असा रुग्ण सुपर स्प्रेडर ठरत नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अँटिजेन किटचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळेच या तपासण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. १ मे रोजी केवळ ९७ अँटिजेन तपासण्या झाल्या होत्या. २ रोजी ७४, तर ३ मे रोजी केवळ ९८ अँटिजेन तपासण्या झाल्याचे दिसून येते.
कोट--------------
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मागील काही दिवसात तपासण्यांचे प्रमाण कमी झाले. हे खरे असले तरी बाधित रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण घटत आहे. ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने तपासणीसाठी पुढाकार घ्यावा, यासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.