कंधार : समाजात सुखात भेटणारे पण दु:खात पाठ फिरवणारे मुबलक आहेत. परंतु दु:खावर मायेची फुंकर घालत आर्थिक मदत देणारे दुर्मिळ आहेत. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य व जय संघर्ष ग्रुप कंधारने तिरुपती येथे गंभीर दुखापतग्रस्त झालेले खाजगी वाहन चालक भरत पाटील टाकळे यांना दहा हजारांची आर्थिक मदत दिली़ या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.आंबुलगा ता.कंधार येथील भरत पा.टाकळे हे बालाजी दर्शनासाठी तिरुपतीला गेले होते. क्रूझर वाहनावरील कॅरियरवर असलेल्या बॅगा काढत असतांना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. अचानक झालेल्या या अपघाताने त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.उपचारासाठी खर्च खूप झाला. आपल्या सहकारी मित्राला दुखापत व आर्थिक त्रास होत असल्यचे ओळखून जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य व जय संघर्ष ग्रुप कंधारच्या खाजगी वाहन चालक भरत टाकळे यांना दहा हजारांची आर्थिक मदत करून आपले योगदान दिले.यावेळी सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ बिराजदार, उपाध्यक्ष साईनाथ मुधीराज, सचिव हनुमंत डोईफोडे, सल्लागार किरण पटणे, संघटक शिवाजी लांडगे, कंधार तालुकाध्यक्ष माधव कांबळे, उपाध्यक्ष एकबाल भाई, संदीप पा. पवार, सचिव शेख सादात, संपर्क प्रमुख शाम पा. बुरफुले, तालुका नियोजन प्रमुख व्यंकटी पा. मोरे, सल्लागार शेख मन्सूर, सहसल्लागार चंद्रकांत जाधव, कोषाध्यक्ष कृष्णकांत शेंडगे, सदस्य शेख खाजा, किशोर बारूळकर, शेख आयुब, प्रल्हाद तेलंग, शेख नजीर, शंकर डांगे, शेख शेफी, संतोष वाघमारे, शेख लतिब, दीपक सोनकांबळे, ज्ञानेश्वर हेडंगे, भूपती पांगरेकर, शेख दस्तगीर, धनंजय गोधेंवाड, आतम बोरुळे, गजानन सांगळे, विजय मठपती, शेख गौस, दयानंद लुंगारे उपस्थित होते़
दुखापतग्रस्त वाहनचालकाला सामाजिक संस्थेकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:36 AM