लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : गडावरील श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कपडे, नारळ, लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले. यात २० लाखांचे नुकसान झाले. ही घटना २४ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़परिक्रमा यात्रेनिमित्त शहरात हजारो भाविक दाखल होत असून सर्व देवस्थानांवर व्यापाऱ्यांकडून दुकाने लावण्याचे काम सुरू आहे़ मंदिरातही साफसफाईचे काम सुरू आहे़ श्रीदत्त शिखर संस्थानचे महंत श्री.प़पू़ मधुसुदन भारती यांच्या पवित्र गादी असलेल्या दालनासमोरच भांडारगृह आहे़ या भांडारगृहात भक्तांनी दिलेल्या वस्तू, नारळ, खण, कपडे, लाकूड व इतर साहित्य ठेवले जाते़ भांडारगृहाचा आकार ४० बाय ८० एवढ्या आकाराचा आहे़आग विझविण्याचे प्रयत्नगडावरच उपस्थित कागणे यांनी घटना वरिष्ठांना कळवून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करून किनवट, पुसद, उमरखेड येथील अग्निशमन वाहनांना पाचारण केले़ घटना कळताच नगरसेवक इलियास बावाणी, ऩप़चे गणेश जाधव व सर्व कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले़ तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी विद्या कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, पो़नि़ लक्ष्मण राख, वैजनाथ स्वामी यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली़ तोपर्यंत उमरखेड, किनवट व पुसद येथील अग्निशमन वाहनांनी आग विझविली़ ४ अग्निशमन वाहनांच्या पाण्याच्या माºयासमोर सकाळी ८ वाजेपर्यंत धुमसत होती़ तर अग्निशमनच्या सात टँकरचे पाणी वापरूनही दुपारपर्यंत धूर निघतच होता़पहाटे लागली आगपहाटे ४ वाजता पहारेकरी व भाविकांना या भांडारगृहातून धूर निघत असलेला दिसल्याने त्यांनी तत्काळ प्रभारी व्यवस्थापक सुदर्शन देशमुख, भागवत मस्के यांना कळविले़ त्यांनी लगेच पोलिसांसह अग्निशमन पथकास कळविले़ तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने संस्थानवरील छोट्या अग्निशमन बंबद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला. मुख्याधिकारी विद्या कदम, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांना घटना कळताच अग्निशमन वाहन चालक शेख मन्सूरभाई यांना वाहनासह तत्काळ पाठवून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले़
श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 1:07 AM