शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा; ऑटो-ट्रकच्या अपघातात नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 8:41 PM

परतणीसाठी जाणाऱ्या नववधूचा अपघाती मृत्यू; भोकर-किनवट रस्त्यावर झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी

भोकर  (जि.नांदेड) : भोकर ते किनवट रस्त्यावरील सोमठाणा पाटी जवळ असलेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे ऑटो (क्र.एम.एच.२९-ए.आर.३२२९) आणि ट्रकचा (क्र.एम.एच.०४-ए.एल.९९५५) भीषण अपघात २१ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान झाला. अपघात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृत्यूमध्ये परतीने जाणारे नववधूचा समावेश आहे. तर नवरदेव जखमी झाला आहे.जारीकोट ता. धर्माबाद येथील नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचे साखरा ता. उमरखेड येथील पूजा तामलवाड यांच्याशी साखरा ता. उमरखेड येथे १९ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. त्यानंतर आज २१ रोजी मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकरमार्गे मॅजिक वाहनाने जाताना भोकर तालुक्यातील सोमठाणा पाटीजवळ सायंकाळी ६ वाजता समोरुन येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवाड (वय २० वर्ष, रा. साखरा ता. उमरखेड), माधव पुरभाजी सोपेवाड (वय ३०, रा. जामगाव ता. उमरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (वय २२ रा. साखरा), सुनील दिगंबर थोटे (वय ३० रा. चालगणी ता. उमरखेड) यांच्यासह अन्य एक (नाव समजु शकले नाही) अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांच्यासह सुनीता अविनाश टोकलवार (वय ४० वर्ष, रा उमरी जहागीर, ता. हदगाव), गौरी माधव चोपलवाड (वय दीड वर्ष रा. उमरी जहागीर ता. हदगाव ) अविनाश संतोष टोकलवार (वय ३६ वर्षे, रा. उमरी जहागीर, ता. हदगाव), अभिनंदन मधुकर कसबे (वय १२ रा.वाजेगाव) यांच्यासह ६ जणांचा समावेश आहे.