सोमवारी महापालिकेच्या वतीने जंगमवाडी मनपा रुग्णालय, शिवाजीनगर मनपा रुग्णालय, विनायकनगर मनपा रुग्णालय, पाैर्णिमानगर मनपा रुग्णालय आणि सिडकोतील मनपा रुग्णालयात कोरोना लस देण्याची व्यवस्था केली आहे. लसीकरण केंद्र वाढल्यामुळे आता शहरात लसीकरणाचा ही वेग वाढणार असल्याचे महापौर मोहिनी येवनकर, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले. सिडकोत झालेल्या लसीकरण केंद्राच्या प्रारंभ कार्यक्रमास महापौर मोहिनी येवनकर, विधान परिषदेचे आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसेविका बेबीताई गुपिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात महापालिकेच्या वतीने १५ मनपा रुग्णालयात कोरोना स्वॅब तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये मनपा दवाखाना सांगवी, तरोडा, जंगमवाडी, पाैर्णिमानगर, शिवाजीनगर मातृसेवा केंद्र, विनायकनगर नवी इमारत, विनायकनगर गंगानगर सोसायटी, श्रावस्तीनगर, खडकपुरा, वजिराबाद मनपा शाळा, हैदरबाग, करबला, अरबगल्ली, कौठा आणि सिडको मनपा रुग्णालयात हे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या त्या भागातील नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.