शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आग बिलोलीत; बंबाची प्रतीक्षा देगलूर, धर्माबादहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:27 AM

लोकमत न्यूज नेटवर्कुबिलोली : तालुक्यात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत मागच्या दोन वर्षांत ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, २ पालिका, ७३ ग्रामपंचायत क्षेत्र व उपविभागीय कार्यालयाचा दर्जा असलेल्या बिलोली तालुक्यात कुठेच अग्निशमन दलाच्या बंबाची सोय नाही़ आपत्कालीन घटनेच्या वेळी देगलूर अथवा धर्माबादहून बंब येईपर्यंत सर्व काही जळून खाक ...

ठळक मुद्दे२ वर्षांत ५० ठिकाणी आग : १२ जूनला महामंडळाचे २६ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कुबिलोली : तालुक्यात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत मागच्या दोन वर्षांत ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, २ पालिका, ७३ ग्रामपंचायत क्षेत्र व उपविभागीय कार्यालयाचा दर्जा असलेल्या बिलोली तालुक्यात कुठेच अग्निशमन दलाच्या बंबाची सोय नाही़ आपत्कालीन घटनेच्या वेळी देगलूर अथवा धर्माबादहून बंब येईपर्यंत सर्व काही जळून खाक होण्याचा प्रकार घडत आहे़बिलोलीत १५ दिवसांपूर्वी महामार्गावरील चार दुकानाला लागलेली आग आटोक्यात न आल्याने सर्वकाही जळून खाक झाले़ ज्यामध्ये २० लाखांचे नुकसान झाले़ १२ जून २०१७ मध्ये बिलोली एस़टी़ महामंडळाच्या आगारात आग लागून संपूर्ण लेखा विभाग कार्यालय जळून गेले़ साधारणत: उन्हाळ्यात अशा घटना सातत्याने घडल्या आहेत़ शहरात यापूर्वी कुंडलवाडी मार्गावरील चार दुकाने त्यापाठोपाठ गांधीनगरच्या वळणावर असलेल्या वाहन दुरुस्ती दुकानांनाही आग लागली होती़लगतच्या कुंडलवाडी, सगरोळी, लोहगाव, आदमपूर, आरळी, सर्कलमध्येही काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आग लागण्याच्या वारंवार घटना घडल्या आहेत़ तालुक्यात कुंडलवाडी, बिलोली, रामतीर्थ व कुंटूर पोलीस ठाण्याचे क्षेत्र बिलोलीत येते़ अशा चार ठाण्यांतर्गत मागच्या काळात आग लागण्याच्या सतत घटना घडलेल्या आहेत़तालुक्याचे क्षेत्र मोठेतालुक्याचे क्षेत्र मोठे आहे; पण परिसरातच अग्निशमन दलाची कुठेच सोय नाही़ बिलोलीपासून धर्माबाद २३ कि़मी़ तर देगलूर ३५ कि़मी़ अंतरावर आहे़ येथील पालिकेकडे अग्निशमन दलाचा बंब आहे़ पण तेथून येईपर्यंत आग पसरलेली असते़ मागच्या दोन वर्षांत कुंडलवाडी, सगरोळी, सावळी, आदमपूर, कासराळी, बिलोली, डोणगाव आदी गावांत आग लागण्याच्या घटना घडल्या़ बिलोली तालुक्यात अग्निशमन दलाची गाडी आवश्यक आहे़

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलNandedनांदेड