आगीमध्ये सागवान, धावडा, लेंडी यासह अन्य प्रजातींच्या वृक्षांची हानी झाली. शासनाने जंगलाची देखरेख करण्याची जबाबदारी वन विभागाकडे दिली आहे. मात्र, या परिसरातील वनरक्षक, वनपाल, वनमजूर मुख्यालयी न राहता इतर ठिकाणांवरून अपडाऊन करतात. त्यामुळे जंगलामध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना वेळीच उपाययोजना करण्यास अडचण निर्माण होत आहे. दत्त शिखर वनदेव रस्त्याच्या बाजूला विद्युत डी. पी. लगत असलेल्या जंगल परिसरात आगीमुळे वन संपत्तीचे नुकसान झाले, तर वन्यप्राण्यांनासुद्धा याचा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या आगीची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी वनप्रेमी नागरिकांनी केली.
◼ माहुरचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. पी. आडे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता वन कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी ताबडतोब पाठवतो, असे त्यांनी सांगितले मात्र ८.३० वाजेपर्यंत जंगल शिवारातील आग मोठ्या प्रमाणात पसरलेली होती.
फोटो : माहूर तालुक्यातील दत्त शिखर परिसरातील वनदेव रस्ता लगत असलेल्या जंगलाला ७ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान आग लागली. मात्र वन विभागास माहिती देऊनही वन विभागाचे कर्मचारी ८.३० वाजेपर्यंत आग लागलेल्या परिसरात पोहोचले नाही. त्यामुळे आगीने मोठ्या प्रमाणात जंगल शिवाराचे नुकसान झाले.