शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

नांदेडचा करारीबाणा हरपला, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 1:00 AM

सरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरू केलेल्या माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांनी आपल्या करारी बाण्याने राजकीय क्षेत्रात नेहमीच दबदबा निर्माण केला.

नांदेड/ उमरी  (जि. नांदेड) :  भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवासराव उर्फ बापुसाहेब बालाजीराव देशमुख गोरठेकर (वय ७८) यांचे बुधवारी रात्री निधन झाले.

बापुसाहेब गोरठेकर यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. रात्री १२.०५ च्या सुमारास त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्यानंतर डॉ.रवींद्र बिलोलीकर यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत जाहीर केले. त्यांच्या पश्चात पं.स.चे माजी सभापती शिरीषराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक कैलास देशमुख ही दोन मुले, दोन विवाहित मुली, बहिण, भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बापुसाहेब गोरठेकर यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या मुळगावी गोरठा (ता. उमरी) येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती प्रवीण चिखलीकर यांनी लोकमत ला दिली.

सरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरू केलेल्या बापुसाहेब गोरठेकर यांनी आपल्या करारी बाण्याने राजकीय क्षेत्रात नेहमीच दबदबा निर्माण केला.  १९९७ ते २००४ या काळात जि.प. सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर तीन वेळा सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेवर ते निवडून गेले. त्यानंतर बापुसाहेब गोरठेकर यांनी यांनी राजकीय क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली. उमरी नगरपालिकेवर राकाँच्या माध्यमातून १५ वर्षे एकहाती सत्ता स्थापन केली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरी खरेदी-विक्री संघ, उमरी सहकारी सोसायटी  या संस्थावर त्यांनी वर्चस्व निर्माण केले.  बापुसाहेब गोरठेकर यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.  मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो- खा. चिखलीकरबापुसाहेब गोरठेकर आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी दिलेला शब्द हा प्रमाण मानल्या जात. शब्दास प्रचंड किंमत देणारा नेता आहे. बापुसाहेब गोरठेकर यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील जाणते विकासासाठी धडपडणारे नेतृत्व काळाच्या पड्याआड गेले आहे. एक मार्गदर्शनक, धुरंधर राजकारणी गमावला, अशी शोकभावना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NandedनांदेडBJPभाजपाDeathमृत्यू