लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलील येथे एका अल्पवयीन मुलीवर मौलानानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती़. या प्रकरणात सोमवारी रात्री आणखी दोन मुलींनी विनयभंगाची तक्रार दिली आहे़. मौलानाने मदरशातील अनेक मुलींसोबत दुष्कृत्य केले असून त्याबाबत तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे़. घटनेनंतर मात्र मौलाना फरार झाला आहे़.चुनाभट्टी येथील मदरशात माजलगाव येथील दोन सख्ख्या बहिणी शिक्षण घेत होत्या़. गेल्या सहा महिन्यांपासून मदरशातील मौलाना साबेर फारुखी याने स्वत:च्या मोबाईलमध्ये असलेली अश्लील चित्रफित दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत होता़. ही घटना कोणाला सांगितल्यास मदरशातून काढून टाकण्याची धमकी या मौलानाने पीडित मुलीला दिली होती़. त्यामुळे एवढे दिवस ही मुलगी हा अत्याचार सहन करीत होती़. मौलानाच्या भीतीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ही मुलगी घरी माजलगाव येथेही गेली नव्हती़. त्यामुळे हिंमत वाढलेल्या मौलाना साबेर फारुखी याने तिच्या लहान बहिणीचाही विनयभंग केला़. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजताच त्यांनी इतवारा पोलीस ठाणे गाठून मौलानाच्या विरोधात तक्रार दिली़. याप्रकरणी मौलाना साबेर फारुखी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला़. परंतु घटनेनंतर मौलाना फरार झाला़. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक वी. क़े़. यादव यांनी मदरशाला भेट दिली़. यावेळी मदशातील अनेक मुलींशी त्यांनी संवाद साधला़. त्यावेळी मौलानाचे अनेक किस्से बाहेर आले़. मदशातील सर्व रेकॉर्ड पोलिसांनी जप्त केले़. दरम्यान, सोमवारी रात्री मौलाना साबेर फारुखी याच्याविरोधात आणखी दोन मुलींनी विनयभंगाची तक्रार इतवारा ठाण्यात दिली़. मौलानाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे़. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे़. सहायक पोलीस अधीक्षक यादव हे स्वत: या प्रकरणावर कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत़. दोषींची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़. दरम्यान, मंगळवारी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते़. त्यातील एक जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला़.मदरशात दोन खोल्यांमध्ये तब्बल शंभर मुलीचुनाभट्टी येथील मदरशामध्ये केवळ दोन खोल्या आहेत़. या दोन खोल्यांमध्ये ५ ते १४ वर्षे वयोगटातील तब्बल शंभर मुली शिक्षण घेत होत्या़. पोलिसांनी ज्यावेळी या मदरशाची पाहणी केली़. त्यावेळी दोन खोल्यांमध्ये शंभर मुली राहतात. कशा ? असा प्रश्न त्यांनाही पडला़. विशेष म्हणजे, मदरशात मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या़. या मदरशातील मुलींना बाहेर कुणासोबत बोलण्यासही अनेक बंधने घालण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़.मौलानाविरोधात तक्रारी वाढण्याची शक्यतागुन्हा दाखल झाल्यानंतर मौलाना साबेर फारुखी हा फरार झाला आहे़. त्याच्या शोधासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत़. या प्रकरणाची व्याप्ती पाहता या मदरशात यापूर्वी शिक्षण घेणा-या मुलींचीही विचारपूस केली जाण्याची दाट शक्यता आहे़. दरम्यान, या प्रकरणानंतर इतवारा पोलीस ठाण्यात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती़.तक्रारी देण्यासाठी निर्भिडपणे पुढे यामदरशात शंभर ते सव्वाशे मुली शिक्षण घेत होत्या़. त्यातील एका मुलीने बलात्काराची इतर दोन मुलींनी विनयभंगाची तक्रार मौलानाच्या विरोधात दिली आहे़. पोस्कोअंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे़. आणखी चार ते पाच तक्रारी येण्याची शक्यता आहे़. कदाचित तक्रारींचा आकडा वाढूही शकतो़. त्यामुळे पोलीस अधीक्षक मीना यांनी या प्रकरणाचा खोलवर तपास करण्याचे आदेश दिले आहेत़. मुस्लिम समाजातील महिला अशा प्रकारच्या प्रकरणात तक्रारी देण्यासाठी सहसा पुढे येत नाहीत, परंतु त्यांच्या पालकांनी निर्भिडपणे पुढे येऊन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन एसआयटीच्या प्रमुख पोनि़ वसुंधरा बोरगावकर यांनी केले.
नांदेडमधील मौलानाच्या शोधासाठी चार पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:06 AM
शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलील येथे एका अल्पवयीन मुलीवर मौलानानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती़. या प्रकरणात सोमवारी रात्री आणखी दोन मुलींनी विनयभंगाची तक्रार दिली आहे़. मौलानाने मदरशातील अनेक मुलींसोबत दुष्कृत्य केले असून त्याबाबत तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे़. घटनेनंतर मात्र मौलाना फरार झाला आहे़.
ठळक मुद्देतपासासाठी एसआयटीची स्थापना आणखी दोन मुलींच्या मौलानाविरोधात विनयभंगाच्या तक्रारी