शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

लाईन ब्लॉकमुळे नांदेड विभागातील चार रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 1:09 PM

नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणाऱ्या काही गाड्या रद्द

नांदेड : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात घेण्यात येणाऱ्या इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणाऱ्या काही गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत़ 

नांदेड विभागाच्यावतीने रद्द झालेल्या गाड्यासंदर्भात दिलेल्या माहितीनूसार गाडी नं. ५१४२२ निझामाबाद ते पुणे १५ जून ते ५ जुलै या कालावधीत रद्द करण्यात आली आहे़ त्याचबरोबर गाडी नं. ५१४३४ पंढरपूर ते निझामाबाद १५ जुलै ते २५ सप्टेंबर या कालावधीत रद्द राहील़  गाडी नं. ५१४२१ पुणे ते निझामाबाद १५ जून ते ६ जुलै आणि १५ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत रद्द करण्यात आली आहे़ गाडी नं. ५१४३३ निझामाबाद ते पंढरपूर १६ जून ते ७ जुलै आणि १६ जुलै ते २७ सप्टेंबर या कालावधीत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ नांदेड विभागातून धावणाऱ्या तीन गाड्या काही कालावधीसाठी अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत़

पंढरपूर यात्रेवेळी दिलासासोलापूर विभागातील इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत़ परंतु, पंढपूर येथील आषाढी एकादशी यात्रा कालावधी यातून वगळण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होणार नाही़ १२ जुलै रोजी पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा आहे़ त्यामुळे ८ जुलै ते १४ जुलैदरम्यान सर्व गाड्या निर्धारित वेळेवर धावतील़ या कालावधीत कुठलीही गाडी रद्द केली जाणार नाही़ यामुळे पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNandedनांदेडRailway Passengerरेल्वे प्रवासी