शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

२९ हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:52 AM

तालुक्यात जि.प. व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाने केली तयारी

कंधार : तालुक्यात जि.प. व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी, सेमी, उर्दू माध्यमातील २५७ शाळेतील २९ हजार ६८५ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जून महिन्यात शाळा प्रवेश दिनीच पुस्तके वितरण करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात जि.प.च्या १८७ ,खाजगी अनुदानित ६५ व उर्दु माध्यमाच्या ५ शाळांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे.इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींना याचा लाभ होणार आहे. मागणी नुसार १ लाख ८२ हजार ८३१ पुस्तके प्रति विषयनिहाय तीन माध्यमासाठी प्राप्त झाली आहेत. त्याचे वितरण जून महिन्यात शाळा प्रवेश दिनी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.३ जून ते १२ जून या कालावधीत कंधार, शेकापूर, फुलवळ, बहाद्दरपुरा, पानभोसी, कुरूळा, बोळका, दिग्रस, आंबुलगा, रूई, कौठा, बारूळ, चिखली, मंगलसांगवी, गोणार, शिराढोण, उस्माननगर या केंद्रावर पुस्तके वितरण केले जाणार आहेत. गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार अधिकारी नंदकुमार कौठेकर यांच्या सहकार्यातून पी.एल.नरहरे, एस.आर.कनोजवार, ओ.एस.येरमे, अशोक डिकळे, अनंत तपासे, एस.एस.मलगीरवार, पी.जी.काळे, डी.एस.चाटे, एस.बी.सूर्यवंशी, बी.जी.निवळे, प्रतिभा सोनकांबळे, ज्योती स्वामी आदीनी वितरणाचे नियोजन केले आहे.शाळा प्रवेशा दिनीच विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमीतून समाधान व्यक्त केले जात आहे.बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, खेळ-करू-शिकू, सुलभभारती, प.अ.नांदेड जिल्हा, प.अभ्यास भाग १, भाग २, सामान्य विज्ञान, इतिहास नागरिकशास्त्र, भूगोल आदी विषयाचा समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वेळेत पाठयपुस्तके मिळणे आवश्यक असते. त्यासाठी प्राप्त पुस्तकाचे वितरण हे शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.विषयनिहाय प्रतीचे वितरणइयत्ता पहिली मधील ३ हजार ३६५ विद्यार्थ्यांसाठी चार विषयाच्या विद्यार्थी व विषय निहाय प्रतीचे वितरण केले जाणार आहे. दुसरीतील ३ हजार ५६१ विद्यार्थी व चार विषय, तिसरी मधील ३ हजार ५५९ विद्यार्थी व पाच विषय आहेत़चौथीतील ३ हजार ८५२ विद्यार्थी व सहा विषय,पाचवीतील ३ हजार ८५६, विद्यार्थी व सहा विषय, सहावीतील ३ हजार ७४४ विद्यार्थी व सात विषय, सातवीतील ३ हजार ७०८ विद्यार्थी व सात विषय व आठवीतील ३ हजार ८४० विद्यार्थ्यांना सात विषय निहाय प्रतिचे वितरण केले जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षणNanded zpनांदेड जिल्हा परिषद