ग्रामीण भागातील शाळा सुरू करा
हदगाव : हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ऑनलाईन शिक्षणही प्रभावी नेटवर्कअभावी मिळत नाही असे कदम म्हणाले.
इस्लापूर परिसरात पेरण्या पूर्ण
इस्लापूर : इस्लापूर, जलधारा, शिवणी परिसरात खरिपाची पेरणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनला पसंती दिली आहे. त्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढला. काही ठिकाणी ट्रॅक्टरने पेरणी सुरू आहे. अधूनमधून झालेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिके उगवली आहेत. सध्या ही पिके डोलत असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.
तूर बियाणे किटचे वाटप
लोहा : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना गोपीनाथ मुंडे अपघातग्रस्त योजनेअंतर्गत तूर बियाणे किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी घुमनवाड, कृषी सहायक आदी उपस्थित होते. तालुक्यातील पार्डी, रिसनगाव, हातनी, लोहा, पेनूर, वडेपुरी, कापसी बु., वाळकी बु., डोणवाडा, सोनखेड, पोखरभोसी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना याचा फायदा झाला.
नायगाव येथे वृक्ष लागवड
नायगाव : ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ सामाजिक संघटनेच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माशीद, मोईन कुरेशी, प्रा. जुबेर खान, शेखर पपुलवाड, नांदेड शहराध्यक्ष सय्यद मुश्ताक, प्रकाश कामळजकर, शेख आरीफ, शेख आझम, शेख मोहीयोद्दीन, सद्दाम पटेल, मुख्याध्यापक आर.एम. चव्हाण, वसंत हणवंते, देवानंद गंगासागरे, प्रकाश धडेकर आदी उपस्थित होते.
अनावश्यक शुल्क रद्द करा
बिलोली : कोरोनामुळे सामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील अनावश्यक विविध विभागाच्या फी रद्द कराव्यात, ट्युशन फीमध्ये २० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी अभियांत्रिकी कृती समितीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी पदाधिकारी साई गायकवाड, प्रवीण पाटील, नामदेव उमरे, सुमीत पोले, अभिजित गादगे, देवानंद ताटे, गौरव देशमुख आदी उपस्थित होते.
अर्धापुरात छत्री वाटप
अर्धापूर : युवक काँग्रेसच्या वतीने शहर व तालुक्यातील पत्रकारांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सोनाजी सरोदे, शेख लायक, नगरसेवक इम्रान सिद्दिकी, व्यंकटी राऊत, महंमद सुलतान, शंकरराव ढगे, नवनाथ ढगे यांची उपस्थिती होती. युवक काँग्रेसचे महासचिव उमाकांत सरोदे यांनी कार्यक्रम घेतला.
जिल्हाध्यक्षपदी शेरूभाई
कंधार : शेकापच्या अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी शेख शेरूभाई यांची निवड झाली. आ. श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. या निवडीबद्दल शेरूभाई यांचे अनेकांनी स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
बिलोली : ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे या मागणीचे निवेदन बिलोली ओबीसी समितीने मुख्यमंत्र्यांकडे पाठविले. यावेळी परीट समाजाचे गंगाधर मावले, कुंभार समाजाचे शंकर कुर्णापल्ले, तालुकाध्यक्ष मारोती दर्शनवाड, बालाजी इबतेवार, रघुवीर ठाकूर, वसंतराव राठोड, दिगंबर मरकंटे आदी उपस्थित होते.
आगग्रस्तांना मदत
किनवट : दिग्रस येथील माधव भैराट यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते. सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील यांनी भैराट कुटुंबाला २३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. २९मे रोजी ही घटना घडली होती. या घटनेत भैराट यांचे मोठे नुकसान झाले होते.
बिलोलीत एमआयएमची बैठक
बिलोली : शहरातील शासकीय विश्रामगृहात एमएमआय कार्यकत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी देगलूर, बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीवर चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष मिर्झा अमजद बेग, उपाध्यक्ष म. रब्बानी, सचिव महंमद गौस रामतीर्थकर, मिर्झा नवाब बेग, रिझवान खान, हाफीज अब्दुल रहीम, सय्यद सलीमोद्दीन, ताहेर देसाई, असद पटेल, युसुफ सय्यद, बबलू आदी उपस्थित होते.
बंडेवार यांचा सत्कार
हदगाव : तामसाचे भूमिपुत्र सुमीत बंडेवार यांचा नेताजी पालकर फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भारत वाळके, उपाध्यक्ष शिवराज वारकड, तेजस उंबरकर, संदीप बंडेवार, पद्माकर पेनूरकर, अतुल तामसेकर आदी उपस्थित होते.
अपघात विमा मंजूर
लोहा : तालुक्यातील १२० शेतकऱ्यांना अपघात विमा मंजूर झाला आहे. विम्याची रक्कम शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात आली. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी तूर बियाणांचे वाटप करण्यात आले.
तालुकाध्यक्षपदी प्रशांत कल्याणे
मुदखेड : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी प्रशांत कल्याणे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांनी केली. नियुक्तीपत्र देताना जिल्हा सरचिटणीस जांभरूणकर, बाळासाहेब भोसीकर, शिवानंद पाटील, आशिष कल्याणे, सतीश कल्याणे, अनुप राऊत, वैभव गंगातीर, अनिरुद्ध सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
गोटमवाड यांना पदोन्नती
कंधार : येथील पंचायत समितीचे अधीक्षक बाबुराव गोटमवाड यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सहायक प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती झाली. सीओ वर्षा घुगे यांनी पदोन्नतीचे आदेश काढले. या पदोन्नतीबद्दल सभापती लक्ष्मीबाई घोरबांड, गटविकास अधिकारी कैलास बळवंत आदींनी त्यांचे स्वागत केले.
बहुजन आघाडीची धरणे
किनवट : पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात या मागणीसाठी बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष किशनराव राठोड, आनंदराव बेंद्रे, मिलिंद वाठोरे, विलास भालेराव, मारोती भुरके, राहुल कापसे, ऋषिकेश कांबळे, ज्ञानेश्वर खरे, आदित्य भवरे, गंगाधर कदम आदी उपस्थित होते.
डोरली शिवारात पाहणी
हदगाव : जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी डोरली शिवारात भेट देऊन बीबीएफ पद्धतीने झालेल्या सोयाबीनची पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, मंडळ कृषी अधिकारी पंकज वाळके, कृषी सहायक अशोक खरात, धनकवाड, सरोदे, भिसे उपस्थित होते.
मारकवाड यांना निरोप
हदगाव : मनाठा पोलीस ठाण्यातील धनाजी मारकवाड यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रशिक्षणासाठी ते नाशिक येथे जाणार असल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक चिठ्ठेवाड यांच्यासह परिसरातील सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.