मालेगाव : मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून, यामुळे रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागतो आहे. वीज पुरवठा बदलून देण्यात यावा, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
मालेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उमरी येथील डी. पी.वरून वीज पुरवठा केला जातो आहे; परंतु या डी.पी.वरून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.
सद्य:स्थितीत या दवाखान्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व प्रसूतीसाठी रुग्ण दाखल आहेत. रात्री अचानक वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. उमरी येथील वीज पुरवठा बदलून तो मालेगाव येथील डी.पी.वरून देण्यात यावा, अशी मागणी आरोग्य केंद्राकडून करण्यात आली आहे; परंतु याकडे वीज वितरण कंपनीने अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास धनगे यांनी कार्यकारी अभियंता अर्धापूर यांच्याकडे वीज पुरवठा बदलून देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
कोट
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास बावीस गावांतील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. दवाखाना ही गावच्या बाहेर आहे. मागील अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असून, यामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचारी व त्रास सहन करावा लागतो आहे. याबाबत वीज पुरवठा बदलून देण्यात यावा, अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे.
डॉ. विलास धनगे
वैद्यकीय अधिकारी, मालेगाव.