यामध्ये किनवटसारख्या दुर्गम भागातील सर्वाधिक ६५, तर माहूर तालुक्यातील शंभर टक्के शाळांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने १० फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, विषय सहायक, विषय व समावेशित साधन व्यक्ती, विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक यांची पूर्वनियोजन ऑनलाइन सभा घेण्यात आली.
प्राचार्य, डाएट, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, मनपा आणि डाएटमधील सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता हे पथक प्रमुख असून, एकूण सात पथके गठित करण्यात आली आहेत.
शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती आधारित चाचणीचे व चाचणी मूल्यांकन करून संकलित गुणदान लिंकमध्ये भरावयाची सूचना केली. भेटीदरम्यान शिक्षकांच्या अध्ययन निष्पत्ती आधारित वर्ग अध्यापनाचे निरीक्षण केले जाणार आहे. निरीक्षणात आलेल्या बाबींवर शिक्षक मुख्याध्यापकांसोबत चर्चा केली जाणार आहे. तालुका/बीट स्तरावर मध्यवर्ती ठिकाणी पर्यवेक्षकीय अधिकारी व मुख्याध्यापकांची सभा घेतली जाणार आहे. चाचणी अध्ययन निष्पत्तीवर आधारित असून, इयता पाचवी मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास भाग १, परिसर अभ्यास २ यावर,
तसेच ६, ७, ८, मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांची बहुपर्यायी एमसीक्यू प्रकारची चाचणी असणार आहे. चाचणीनंतर मूल्यांकन करून गुगल फाॅर्मवर आणि प्रतिसाद नोंद तक्त्यावर विद्यार्थी प्रतिसाद गुण नोंदविण्यात येतील. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, सर्व शिक्षक शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. चाचणीनंतर शिक्षकांचे अध्यापनाचे वर्ग निरीक्षण केले जाणार आहे.
चाचणीमध्ये कमी गुणांकन मिळाले, तर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. शिक्षकांना अध्यापनासाठी दिशा प्राप्त व्हावी हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.