शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

सगरोळीत केवळ गाढवांसाठीच पूर्णवेळ दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:14 AM

सगरोळी (जि.नांदेड) - बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे धर्मा डॉंकी सँचुरी संस्थेच्यावतीने केवळ गाढवांसाठीच पूर्णवेळ दवाखाना सुरु करण्यात आला आहे. ...

सगरोळी (जि.नांदेड) - बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे धर्मा डॉंकी सँचुरी संस्थेच्यावतीने केवळ गाढवांसाठीच पूर्णवेळ दवाखाना सुरु करण्यात आला आहे. या चिकित्सलयाच्या उद्घाटना दिवशीच आयोजित शिबीरामध्ये २२० गाढवांचे लसीकरण व निजंर्तुकीकरण करण्यात आले. गाढवास एखादा आजार जडला तर त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. उपचाराअभावी पशू पालकांचेही मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने हा दवाखाना सुरु करण्यात आला असून महाराष्ट्रातील हा एकमेव दवाखाना असल्याचे संस्थेचे विश्वस्त अभिजीत महाजन यांनी सांगितले.

अमेरिकास्थीत असलेले रतीलाल आणि बोनी शहा हे दाम्पत्य कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी सगरोळी येथे उभारलेल्या संस्थेमध्ये येत असत. शहा दाम्पत्य अमेरिकेत प्राण्यांसाठी काम करतात. सगरोळी येथे आल्यानंतर त्यांनी परिसरात गाढवांना मोठ्या प्रमाणात ओझे वाहून नेताना पाहिले. या गाढवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातूनच धर्मा डाँकी सँचुरी या संस्थेची सन २००० मध्ये माजी केंद्रीयमंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. या माध्यमातून गाढवांचे पालन करणाऱ्यांचा संपर्क वाढत गेला. गाढवांच्या आरोग्यासंदर्भातील अनेक बाबी पुढे आल्यानंतर केवळ गाढवांसाठीच हा पूर्णवेळ दवाखाना सुरू केल्याचे महाजन यांनी सांगितले. गाढवांना सर्रास चर्रा नावाचा आजार होतो. यामध्ये गाढव चक्कर येऊन गोल फिरून खाली पडले आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. गाढवाच्या मृत्यूमुळे पशूपालकांचेही मोठे नुकसान होते. उपचारांची सोय नसल्याने गाढवांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या रुग्णालयामुळे हे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी सांगितले. बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत या चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त रोहीत देशमुख यांच्यासह डाॅ.शंकर उदगीरे, डाॅ.अरविंद गायकवाड, डाॅ.एस.बी.रामोड, कृषी विज्ञान केंद्राचे पशूवैद्यक डाॅ.निहाल अहमद मुल्ला, भास्कर बुच्छलवार, राजू गिरगावकर यांची उपस्थिती होती.

सहा ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन

सगरोळी येथे हा पूर्णवेळ दवाखाना चालविण्यात येत असून येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातील डाॅक्टर तपासणी आणि उपचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र इतर भागातील गाढवांना उपचार मिळण्याची गरज आहे. सगरोळी येथे उपचारासाठी आणताना त्यांची पायपीट होऊ नये यासाठी संस्थेने पुढील आठवड्यात सगरोळीसह मुगाव, बरबडा, तमलूर, एकलारा, आरोळी आदी सहा ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजनही केले आहे.

चिकित्सालयात लसीकरणाबरोबरच उपचारही

गाढव हा अश्व गटातील प्राणी आहे. गाढवाच्या शरीराची रचना वेगळी असल्याने त्याच्यावर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डाॅक्टरांकडूनच उपचार करावे लागतात. सध्या सगरोळी येथील या चिकित्सालयात गाढवांचे लसीकरण, निर्जंतुकीकरण याबरोबरच विविध आजारावर उपचारही केले जात आहेत. या दवाखान्यासाठी कुठलाही शासकीय निधी उपलब्ध नसला तरी हैदराबाद येथील ब्ल्यू क्राॅस आणि दिल्ली येथील प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ब्रुक हाॅस्पीटलची मदत मिळत असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

(फोटो कॅप्शन - बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे धर्मा डाँकी सँच्युरी या संस्थेच्या वतीने केवळ गाढवांसाठी चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे. बुधवारी तज्ज्ञ डाॅक्टरांनी २२० गाढवांचे लसीकरण व निर्जंतुकीकरण करत विविध आजारावर उपचारही केले. )

(फोटो क्रमांक - २४ एनपीएच डीईसी- ०१ जेपीजी)