शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

अभिनय माझ्यासाठी आनंदसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:20 AM

१९९२ मध्ये ‘गेला माधव कुणीकडे?’ या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला़ जाईल तिथे हे नाटक गर्दी खेचत होते़ काम करतानाही समाधान मिळत असल्याने नाट्यक्षेत्रावरच मी लक्ष केंद्रित केले़ थिएटरला चिटकवून राहिलो़ म्हणूनच आज विविध नाटकांचे ११ हजार ८३८ हून अधिक प्रयोग करु शकलो़ रसिकांचे प्रेम लाभते आहे़ खरे तर रंगभूमी माझ्यासाठी आनंदसोहळा असल्याचे दिलखुलास मनोगत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले़

ठळक मुद्देप्रशांत दामले : रंगभूमी म्हणजे दररोज होणारी निवडणूक

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : १९९२ मध्ये ‘गेला माधव कुणीकडे?’ या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला़ जाईल तिथे हे नाटक गर्दी खेचत होते़ काम करतानाही समाधान मिळत असल्याने नाट्यक्षेत्रावरच मी लक्ष केंद्रित केले़ थिएटरला चिटकवून राहिलो़ म्हणूनच आज विविध नाटकांचे ११ हजार ८३८ हून अधिक प्रयोग करु शकलो़ रसिकांचे प्रेम लाभते आहे़ खरे तर रंगभूमी माझ्यासाठी आनंदसोहळा असल्याचे दिलखुलास मनोगत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले़‘साखर खाल्लेला माणूस’ या नाट्यप्रयोगाच्यानिमित्ताने नांदेडमध्ये आल्यानंतर प्रशांत दामले यांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली़ याप्रसंगी ते बोलत होते़ नाटक हा माझ्यासाठी छंद आहे़ त्याचे व्यवसायात रुपांतर झाले असले तरी हे काम माझ्यावर कुणी लादलेले नाही़ त्यामुळेच काम करताना मला दमायला किंवा कंटाळायला होत नाही़ खरेतर रंगभूमी म्हणजे दररोजचे मतदान, दरररोजची निवडणूक़ दूरचित्रवाणीवरील मालिका, सिनेमाचे तसे नाही़ चित्रपट टी़व्ही़ मालिका या कलाकारापेक्षा दिग्दर्शकाचे माध्यम आहे़ तर नाटकात लिखाण झाल्यानंतर ही कलाकृती टीमकडे सुपूर्द होते़ रंगभूमी हे जिवंत माध्यम असल्याने मी त्यात अधिक रमतो़ नाटकाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरायला मिळते़ नुकतेच सुरु असलेले ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाच्या निमित्ताने आज सगळीकडे फिरतो आहे़ या नाटकाचे आठ परदेश दौरे झाले आहेत़ इतर कुठल्याही नाटकाला हे करता आलेले नाही़ हे नाटक घेवून अगदी मी ‘टोकियो’ ला जावून आल्याचेही ते म्हणाले़शहरी भागात नाटक केंद्रित झाले़ असा आक्षेप असतो़ मात्र नाटकासाठी आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध नसतात़ केवळ एवढ्याच कारणामुळे तेथे नाटक घेवून जाता येत नाही़ अन्यथा आम्हा कलाकारांना शहराबरोबरच ग्रामीण भागातही जाण्याची इच्छा असते़ राज्यात जिथे नाटक घेता येवू शकतात अशी ८३ ठिकाणे आहेत़ मात्र त्यातील फक्त एकाचा थिएटरमध्ये उत्तम प्रयोग करता येवू शकतो़ असे सांगत दामले यांनी राज्यातील नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले़ अनेक शहरातील नाट्यगृहे आज नादुरुस्त अवस्थेत आहेत़ साधी स्वच्छतागृहेही ठिकठाक नसतात़मध्यंतरी औरंगाबाद येथील एका नाट्यगृहात आमच्या नाटकाच्या टीमला स्वच्छता करावी लागल्याचे त्यांनी सांगितले़ नाट्यप्रयोगासाठी येणारा खर्चही अलीकडील काळात वाढला आहे़ वाहनांपासून निवास, जेवण, भत्ते आदी सर्व बाबी महागल्याने नाटक घेवून जाताना़ त्यासाठी प्रेक्षक किती मिळेल हाही विचार करावा लागतो़ मी चिवट आहे़ त्यामुळे दौरे करतो; पण ते सगळ्यांनाच जमेल असे नाही़ असेही त्यांनी सांगितले़ वेळेचे उत्तम व्यवस्थापन याकडे माझा नेहमीच कटाक्ष असतो़ सुमारे १२ हजार प्रयोगांपैकी आजवर केवळ दोनच प्रयोग रद्द करण्याची माझ्यावर वेळ आली़ विशेष म्हणजे माझे सर्व नाट्यप्रयोग वेळेवर सुरु होतात़ असेही त्यांनी आवर्जून सांगितले़गंभीर विषय विनोदीपद्धतीने प्रेक्षकांसमोरसध्याचे युग स्पर्धेचे आहे़ त्यामुळे प्रत्येकजण कुठले ना कुठले ध्येय घेवून धावताना दिसतो़ हे लक्ष्य गाठताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत होणारी धावाधाव त्यातून स्वत:कडे व कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष त्यातून उद्भवणाºया व्याधी हा अत्यंत गंभीर विषय ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाच्या माध्यमातून विनोदीपद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला आहे़ खरेतर अलीकडील काळात एकमेकांसोबतचा संवाद कमी झाला आहे़ त्यातून गैरसमज, चिडचिड होते़ मात्र हा त्रागा किती चुकीचा आहे़ हे या नाटकाच्या माध्यमातून मांडल्याचे अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले़ नाटक हे टीमवर्क असते़ प्रत्येक नाटकाच्या संहितेत मोकळीक असते़ या जागा शोधायचे काम दिग्दर्शक, कलाकारांचे असते, असेही दामले यावेळी म्हणाले़

टॅग्स :Prashant Damleप्रशांत दामले