लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेतंर्गत जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींकडे स्वत:ची इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. प्रशासनाच्या अहवालानंतर संबंधित ग्रामपंचायतींना इमारत बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १ हजार ३१२ ग्रामपंचायतींमधून अर्ध्याहून अधिक ग्रामपंचायतींकडे स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे बहुतांश ग्रा.पं. चे कामकाज हे भाड्याच्या इमारतीमधून केले जाते. सरकारने संबंधित ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेमध्ये सहभागी करून सदर ग्रा.पं.च्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, ज्या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न कमी व दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या मागास क्षेत्रातील ग्रामपंचायतींना सदर योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच सदर योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी १२ लाख तर दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे.इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या एकूण निधीच्या ९० टक्के निधी राज्य शासनाकडून दिला जाणार असून केवळ १० टक्के रक्कमेची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायतींना करावी लागणार आहे़चार वर्षांसाठी ४४० कोटी रूपयांची तरतूदवर्ष २०१७-२०१८ साठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु, सदर योजनेंतर्गत एकाही ग्रा.पं. चा समावेश झाला नाही. तर वर्ष २०१८-१९ मध्ये योजनेंतर्गत एकूण ११० कोटी रूपयांची तरतूद शासनाने केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी निधी देण्याची तयारी सुरू केली असून आगामी चार वर्षासाठी योजनेंतर्गत ४४० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रा.प़ं इमारतीसाठी मिळणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 AM
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेतंर्गत जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींकडे स्वत:ची इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. प्रशासनाच्या अहवालानंतर संबंधित ग्रामपंचायतींना इमारत बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देनांदेड:निम्म्या ग्रा़प़ंकडे स्वत:ची इमारत नाही