चाैकट....
पावने तीनशे काेटींचा प्रकल्प १६०० काेटींवर
* फेब्रुवारी २००८ला नांदेड-यवतमाळ-वर्धा हा रेल्वे मार्ग जाहीर झाला हाेता. ११ फेब्रुवारी २००९ला तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन पार पडले.
* या प्रकल्पाची मूळ किंमत २७४ काेटी ५५ लाख एवढी हाेती. मात्र सध्या हा प्रकल्प १,६०० काेटींवर पाेहाेचला आहे.
* यात केंद्र शासनाचा निधीचा वाटा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के एवढा आहे.
* २८४ किलोमीटरच्या या मार्गात एकूण २७ रेल्वे स्थानके असून, त्यातील तीन जुनी आहेत.
* या मार्गाचे भू-संपादन पूर्णत्वाकडे आहे. वर्ध्यापासून यवतमाळपर्यंत मार्गाचे मातीकाम पूर्ण झाले आहे.
* या मार्गासाठी माजी खासदार विजय दर्डा हे राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.