शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

माध्यमशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By admin | Published: February 13, 2015 3:14 PM

स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील अध्यापनासाठी पात्रताधारक प्राध्यापकांऐवजी कार्यालयीन कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य सोपविण्यात आले आहे.

नांदेड: स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील अध्यापनासाठी पात्रताधारक प्राध्यापकांऐवजी कार्यालयीन कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य सोपविण्यात आले आहे. त्यामुळे या संकुलातील विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.विद्यापीठातंर्गत माध्यम संकुलातील इलेक्ट्रॉनिक मिडिया या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अवस्था भरकटल्यासारखी झाली आहे. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमाचे प्रथम सत्र नुकतेच संपले आहे. परंतु हे सहा महिने प्रशासकीय कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांनेच त्यांचे तास घेतले. त्यामुळे या काळात हे विद्यार्थी नेमके काय शिकले? हा संशोधनाचा विषय आहे. तांत्रिक विभागातील या कर्मचार्‍याने आपल्या अधिकाराचा वापर करून अनेकांना कोंडीत पकडले आहे. विद्यापीठ प्रशासनाने या कर्मचार्‍याला केवळ अध्यापनासाठीच नव्हे तर पेपर तपासणीसाठी तसेच बहिस्थ परिक्षक अशा अतिशय महत्वाच्या कामावर नियुक्त केले हे विशेष. इलेक्ट्रॉनिक विभागात इतर प्राध्यापक सुद्धा पात्रताधारक नसल्यामुळे भावी पत्रकारांचे आयुष्य अंधकारमय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. या संकुलाचे प्रमुख मात्र या सर्व प्रकाराबाबत धृतराष्ट्राची भूमिका घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थीच संभ्रमात आहेत. या संकुलातील गैर प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या छळाच्या घटना वाढत असल्याची तक्रार एसएफआय या विद्यार्थी संघटनेने केली आहे. या सकुंलातील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या एक कोटी साहित्याचा उपयोग होत नसल्याचा व पूर्णवेळ प्राध्यापक तासिका घेत नसल्याचा आरोपही संघटनेच्या वतीने केला आहे. संबंधित प्राध्यापकांच्या चौकशीची मागणी करून विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ पात्रताधारक प्राध्यापक नियुक्त करावेत, अशी मागणी एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष बालाजी कलेटवाड, विकास वाठोरे, सचिन खडके, अविनाश घाडगे, देवा खाडे, सुमेध सदावर्ते यांनी केली आहे. /(प्रतिनिधी)