देगलूरला चाैकाचे अनावरण
देगलूर - येथील महाविद्यालयासमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकास संत सेवालाल महाराज चौक असे नाव देण्यात आले. चौकाचे अनावरण समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक यांच्याहस्ते झाले. यावेळी विशाल पवार यांनी आभार मानले. यावेळी धोंडिबा राठोड, बालाजी जाधव, नाळू पवार, राजू पवार, रमेश राठोड, रमेश चव्हाण, नंदू राठोड, दत्ता पवार आदी उपस्थित होते.
बेल्ट प्रमाणपत्र वितरण
नायगाव - येथील ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये आयोजित बेल्ट आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी राजेंद्रकुमार बैस व क्षितिजा बैस यांनी ब्लॅकबेल्ट पदवी मिळविली. कार्यक्रमात कुमुद पटेल, किशोर पांचाळ, स्वप्नील पांचाळ, पांडे, नागठाणे उपस्थित होते.
गाडगे महाराज जयंती
अर्धापूर - अर्धापूर तालुक्यात ठिकठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील सखाराम लंगडेनगरात आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मुंजाजीराव लंगडे, राम पाटील, सचिन काळे, संतोष कऱ्हाळे, सखाराम क्षीरसागर, गुणवंत वीरकर, उद्धव सरोदे, मुकिंदा मोहिते, गजानन मुधळे, मारोती मुधळे आदी उपस्थित होते.
नुकसानीची भीती
देगलूर - वातावरणातील बदल आणि पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. यासह आंबा, द्राक्ष, कांदा, लसूण, टरबूज, खरबूज आदींचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा पाऊस पडला, तर काढणीला आलेला हरभराही वाया जाणार आहे.
रेणुकामाता मंदिर सुरू
माहूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहूर गडावरील दत्त मंदिर बंद करण्यात आले असले, तरी रेणुकामाता मंदिर मात्र सुरू आहे, अशी माहिती व्यवस्थापक जयंत देशमुख यांनी दिली. त्यामुळे मातेचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची चांगलीच सोय झाली आहे.
कुंडलवाडीत एक पॉझिटिव्ह
कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी १४ जणांची रॅपिड ॲण्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात एक पॉझिटिव्ह आढळला. नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहुरे यांनी केले आहे.
गाडगे महाराज जयंती
लोहा - तालुक्यातील कापसी बु. येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच ललिता आळणे, सदस्य नागेश पाटील, केशव वडवळे, संतोष वडवळे, मोहन टोम्पे, शिवाजी देवदे, संजय वडवळे, व्यंकटेश शिरसाठ, शिवाजी आळणे आदी उपस्थित होते.
विकासकामांचे भूमिपूजन
कंधार - तालुक्यातील वंजारवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. श्यामसुंदर शिंदे यांच्याहस्ते झाले. बिनविरोध निघणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीस शिंदे यांनी जाहीर केले होते. वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने पाच लाखांच्या निधीतून सीसी रस्त्याचे भूमिपूजन यावेळी झाले. याप्रसंगी आशा शिंदे उपस्थित होत्या.
दुचाकीचा अपघात
मुदखेड - बारडपासून दोन कि. मी. अंतरावरील खैरगाव पाटीजवळ दोन दुचाकींचा अपघात झाला. यात दोघे जखमी झाले. लक्ष्मण शंकर येललकर व धनेश्वर येलमोले हे दोघे (एमएच २६-यु.४७७३) या क्रमांकाच्या दुचाकीवरून नांदेडकडे जात असताना खैरगाव पाटीजवळ त्यांना अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले.
टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
लोहा - शिवजन्मोत्सव व महाशिवरात्र यात्रेनिमित्त धनज खु. येथे टेनिसबॉल खुल्या क्रिकेट स्पर्धा आयोेजित करण्यात आल्या आहेत. पहिले बक्षीस २१ हजार, द्वितीय ११ हजार दिले जातील. याशिवाय बेस्टबॉलर, बेस्टकीपर, मॅन ऑफ द सीरिजसाठीही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.