महापालिका हद्दीत आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, संबंधित यंत्रणा यासह पोलीस निरीक्षक यांनी सर्व गणेश मंडळांची मनपा क्षेत्रातील यादी उपलब्ध करून प्रत्येक मोठ्या गणेश मंडळाने १८ वर्षांवरील किमान ११०० नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी महापालिका आवश्यक ते मनुष्यबळ, लस पुरवणार आहे. लसीकरणासाठी मनपा आरोग्य विभाग सहकार्य करणार आहे. नगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांनाही उपरोक्तप्रमाणे लसीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण क्षेत्रातही तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील यांनी गणेश मंडळांच्या माध्यमातून लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीचा साठा मागणीप्रमाणे उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना दिली आहे. मनपाचे उपायुक्त लसीकरणाचा दैनंदिन आढावा घेतील तर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका क्षेत्रातील आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण भागातील लसीकरणाबाबत दररोज माहिती सादर करतील, असेही निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात गणेश मंडळ तेथे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:19 AM