नांदेड : शहरातील रस्त्यांवरुन जाणा-या नागरिकांना अडवून लुबाडणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले होते.१३ फेब्रुवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास ज्ञानमाता शाळेसमोरील बायपास रोडवर कानाराम आत्माराम चौधरी (रा. खालसा हायस्कूल दशमेशनगर) हा विद्यार्थी व त्याचे तीन मित्र वडिलांनी राजस्थान येथून पाठविलेले खाद्यपदार्थ आणण्यासाठी जात होते. हे खाद्य पदार्थ एका ट्रॅव्हल्सने नांदेडात आले होते. यावेळी दोन दुचाकीवर आलेल्या आरोपींनी चौधरी व त्यांच्या मित्रांना खंजीरचा धाक दाखवून सोने-चांदी, मोबाईल व रोख असा ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविला होता. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, विमानतळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते. सदरचा गुन्हा किरण बंडे (रा. मगनपुरा) व अनिल भांडवले (रा. गांधीनगर) यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबºयाकडून मिळाली. त्यानंतर पोनि सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी.डी. भारती यांच्या पथकाने अनिल भांडवले व किरण बंडे या दोघांना पकडले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आणखी तीन साथीदार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. फरार असलेले हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात शिवाजीनगर, विमानतळ, भाग्यनगर, वजिराबाद या पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना विमानतळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भारती, सपोउपनि खाडे, पोहेकॉ कुलकर्णी, पोतदार, अफजल पठाण, व्यंकट गंगुलवार, नागरगोजे, ब्रह्मानंद लामतुरे, शेख जावेद, महमद अली, गजानन बैनवाड, राजू पुलेवार, वसमते यांनी ही कारवाई केली.खाद्य पदार्थ एका ट्रॅव्हल्सने नांदेडात आले१३ फेब्रुवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास ज्ञानमाता शाळेसमोरील बायपास रोडवर कानाराम आत्माराम चौधरी हा विद्यार्थी व त्याचे तीन मित्र वडिलांनी राजस्थान येथून पाठविलेले खाद्यपदार्थ आणण्यासाठी जात होते.
वाटमारी करणाऱ्या टोळीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:27 AM
शहरातील रस्त्यांवरुन जाणा-या नागरिकांना अडवून लुबाडणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले होते.
ठळक मुद्देस्थागुशाची कारवाई: दोन आरोपींना केली अटक