मुखेड (नांदेड) : मुखेडची माती ही सुपीक आहे़ तशीच माणसंही सुपीकच आहेत़. मुखेडच्या माणसात मातीविषयी भाव आहे़, भास्कर चौधरी यांनी गावासाठी सभागृह बांधतो असे सांगितले हे दानत्व महत्त्वाचे आहे़. ज्याच्यामध्ये कलागुण आहेत, त्यांना मुक्त प्रवेश द्या. कलाकारांना एकत्रित करुन कामाचे नियोजन करा, जे काही नवउपक्रम करायचे आहेत ते आपल्या गावापासून सुरु करा, असा सल्ला प्रसिध्द कलावंत तथा नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी दिला.
तालुक्यातील ‘किर्तीवंत भूमी पूत्रांना हाक आईची’ या शीर्षकाखाली येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित गुणवंताच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी डॉ़ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज होते़ व्यासपीठावर माजी आ़. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ़. सदानंद पाटील, सा़.बां.विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, सेवानिवृत्त सचिव आर.क़े़. गायकवाड, मत्स्य व्यवसाय आयुक्त गोविंद बोडके, उपजिल्हाधिकारी हरचंद्र पाटील चांडोळकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ़. श्रीपत चव्हाण, प्राचार्य नागोराव कुंभार, विभागीय सहसंचालक प्रा़. उत्तम सोनकांबळे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता नागनाथ उमाटे, कृषी संचालक सुरेश अंबुलगेकर, चंद्रशेखर बोईनवाड, बालाजी कार्लेकर, सदाशिव कुलकर्णी, डॉ़. शिवराज इंगोले, चित्रपट दिग्दर्शक डॉ़. शिवानंद स्वामी, अरविंद मुखेडकर, शंकर सुगावे, बिल्डर भास्कर चौधरी, डॉ़. मंजुषा कुलकर्णी, तारा बोमनाळे, दुर्गादास कुलकर्णी, अंजली कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती़
जिव्हाळा मित्र समुहाच्या माध्यमातून वाचनालय, व्यायामशाळा उभारा, यातून वाचकांची भूक वाढेल. वाचनालयात सर्व विषयावरील पुस्तके उपलब्ध करुन द्या. पुस्तकावर जास्त खर्च केला तर पुतळ्यावर खर्च करण्याची वेळ येणार नसल्याचे सांगत, प्रत्येक माणसात कलागुण उपजत असतात, त्या गुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही अनासपुरे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक डॉ़. श्रावण रॅपनवाड यांनी तर सूत्रसंचालन दिलीप देवकांबळे व यशवंत बोडके यांनी केले. आभार डॉ़.रामराव श्रीरामे यांनी मानले़. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली़.