जिल्ह्यातील प्रत्यक्षात कोविड - १९ काळात ज्यांनी जनसेवेचे कार्य केले, त्यांचा सन्मान होणे आवश्यक होते. विविध संस्था व शासकीय स्तरावर अनेक कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. काही रस्त्यावरच्या गरजवंंतांना सहकार्य करणारे सन्मानापासून वंचितच होते. सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॉ. रवींद्र जाधव यांच्या संकल्पनेतून कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १७० योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये लोक प्रशासन, पोलीस, वैद्यकीय, विधी, पत्रकारिता आणि सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या प्रत्यक्षात कार्य केलेल्या मान्यवरांचा समावेश होता. प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. विजय गाभणे, कॉ. ॲड. प्रदीप नागापूरकर, प्रा. सदाशिव भुयारे, कॉ. उज्ज्वला पडलवार, कॉ. सुभाशिष कामेवार, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, प्रितपालसिंघ साहू, भारत खडसे, संजय गोटमुखे, भारत सरोदे, अहेमद बाबा बागवाले, गणेश मोरे, प्रा. ईरवंत सूर्यकार, प्रा. देविदास इंगळे, कॉ. संगीता गाभणे, पोलीस निरीक्षक अनंत नरुटे, सहायक आयुक्त जगदीश कुलकर्णी, धनंजय सोळंके, अंकुश सोनसळे, भारत दाढेल, रमेश मस्के, कॉ. श्याम लाहोटी, गणेश गुरुजी वाघमारे, अल्ताफ हुसेन, सुनील पारडे, महेंद्र भटलाडे, साहेबराव गुंडिले, कॉ. बंटी वाघमारे, आदींची उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी कॉ. मारोती केंद्रे, कॉ. सं. ना. राठोड, कॉ. मुकेश गर्दनमारे, कॉ. संतोष बोराळकर, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. दतोपंत इंळे, कॉ. मगदूम पाशा, कॉ. सुभाषचंद्र गजभारे, कॉ. संतोष साठे, कॉ. अनुराधा परसोडे, कॉ. द्रोपदा पाटील, कॉ. मीरा बहादुरे, कॉ. लता गायकवाड यांनी प्रयत्न केले.